HW News Marathi
राजकारण

दारुच्या प्रतिकात्मक बाटल्यांवर मुख्यमंत्र्यांचा फोटो

पुणे | राज्य सरकारच्या घरपोच दारु पोहचविण्याच्या निर्णयामुळे सरकारवर सर्व स्तरातून टिका होत आहे. असे असताना सरकारच्या तथाकथीत निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादीने सोमवारी निदर्शने केली. पुण्याच्या बालगंधर्व चौकातील झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर ही निदर्शने करण्यात आली.

टाळ, विना आणि मृदंगाच्या तालावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी भजन देखील म्हटले. भाजप सरकारचा यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून निषेध आणि राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यात आला. यावेळी निदर्शने करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हातात दारुच्या बाटल्यांचे प्रतिकात्मक पोस्टर धरले होते. या पोस्टर्सवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो असलेले पहायला मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पेट्रोल पंपांवर मोदींचा फोटो, दरवाढीचा फलकही लावा! – उद्धव ठाकरे

News Desk

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी RSSचे मुख्यालय आणि दीक्षाभूमीला दिली भेट

Aprna

“मी मुख्यमंत्री पदी नको, समोर येऊन सांगा मग…,” मुख्यमंत्र्यांचे एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन

Aprna
राजकारण

राममंदिर प्रकरणी शशी थरूर यांचे वादग्रस्त वक्तव्य

Gauri Tilekar

नवी दिल्ली | कोणत्याही ख-या हिंदू व्यक्तीला दुस-याच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधले जावे असे वाटणार नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केले आहे. अयोध्या येथील राम मंदिरप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी असे वक्तव्य करून स्वतःवर पुन्हा नवा वाद ओढवून घेतला आहे. चेन्नई येथील ”द हिंद लिट फॉर लाइफ डायलॉग 2018” या आयोजित कार्यक्रमादरम्यान शशी थरूर बोलत होते. “हिंदू अयोध्येत भगवान रामाचा जन्म झाला असे मानतात. त्यामुळे कोणत्याही ख-या हिंदू व्यक्तीला दुस-याच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधले जावे, असे वाटणार नाही”,असे थरूर म्हणाले.

शशी थरूर हे वारंवार त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि ट्विट्समुळे चर्चेत राहत असतात. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होते. काहीच दिवसांपूर्वी शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींविरोधात एक ट्विट केले होते. यावेळी त्यांनी मोदींवर टीका करण्यासाठी floccinaucinihilipilification हा शब्द वापरला होता. नेटिझन्सना या शब्दाचा अर्थ न समजल्याने तसेच हा शब्द उच्चारणे देखील मोठे अवघड झाल्याने शशी थरूर यांच्यावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर आता काही दिवसांत पुन्हा शशी थरूर यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे ज्यामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो.

राम मंदिर तयार होऊ नये अशी त्यांची इच्छा !

काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. “अयोध्येत राम मंदिर तयार होऊ नये अशीच काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे. म्हणूनच काँग्रेस नेते वारंवार असे वादग्रस्त विधाने करत असतात. ते समाजापर्यंत देखील असाच संदेश पोहोचविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, असे भाजप नेते नरसिंहा यांनी म्हटले आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजिद मेमन यांच्याकडून शशी थरूर यांच्या या विधानाचे समर्थन केले गेले आहे.

Related posts

शिवरायांच्या भूमीतले असूनसुद्धा जनतेला फसवून पवारांना झोप कशी लागते ?

News Desk

“अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Aprna

अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार

News Desk