जयपूर | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर टीका करीतच असतात. आता पुन्हा राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘उत्तर प्रदेशात एक आमदार महिलेवर बलात्कार करतो. तरीही देशाच्या पंतप्रधानांच्या तोंडून एक शब्दही निघत नाही,’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. ‘पंतप्रधान बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अशी फक्त घोषणा देतात. परंतु, जेव्हा प्रत्यक्षात महिलांसाठी काहीतरी करुन दाखवायची वेळ येते तेव्हा ते काहीच करीत नाहीत,’ अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.
A UP MLA raped a woman, but the Prime Minister remained silent. UP Chief Minister did not say a word. PM gave a good slogan in support of women, but when the time came to walk the talk, he did nothing: Rahul Gandhi at Mahila Congress event in Kota. #Rajasthan pic.twitter.com/kIGD47LBQh
— ANI (@ANI) October 25, 2018
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. ते कोटामध्ये महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित होते. ‘महिला काँग्रेस अनेक बाबतीत आम्हाला मागे टाकून पुढे गेल्या आहेत. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या शहरात, गावात सर्वत्र पाहायला मिळतात. मात्र जेव्हा भाजपाच्या विरोधात लढण्याची वेळ येते तेव्हा त्या नाहीशा झाल्यासारखे वाटते. मात्र तसे न होता तुम्ही सर्वच आघाड्यांवर भाजपाशी संघर्ष कराल, अशी मला आशा आहे,’ असे राहुल गांधी यावेळी महिला कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.