HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज (९ एप्रिल) थंडावणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील २० राज्याच्या ९१ जागांवर निवडणुकासाठी मतदान होणार आहे. देशात ७ टप्प्यात मतदान होणार असून २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात  नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांच्या प्रचारतोफा आज संध्याकाळी सहा वाजतेपर्यंत थंडावणार आहेत. त्यापूर्वीच युती आणि आघाडीच्या उमेदवारांकडून अंतिम टप्प्याच्या सभा, रॅली आणि भेटीचा जोर वाढलेले चित्र सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे.

नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहिर, नाना पटोले यासारख्या दिग्गज नेत्यांसह ११६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहेत. चार जागांवर भाजप आणि काँग्रेसचा थेट आमना-सामना होणार आहे. तर दोन जागांवर काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांसोमर आले आहेत.

 

Related posts

समृध्दी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव द्या !

News Desk

आरपीआयला लोकसभेसाठी एक जागा द्यावी !

News Desk

‘ठाकरे’ सिनेमाचे दिग्दर्शक-निर्माते यांच्यात आता ट्विटर वॉर

News Desk