HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप जाहीर सभेत सादर

ठाणे | पालघर लोकसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी पालघरमध्ये भाजपाच्या पैसे वाटत असलेल्या १२ जणांना पकडून सेनेने पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी पैसे वाटले जात असल्याचा आरोप सेनेने केला आहे.

हा वाद रंगला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप ऐकवून दुसरा धक्का दिला आहे. या क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांनी विजयासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर मित्रपक्षा विरोधात करण्याचे आदेश भाजपच्या कार्यकर्त्यांना दिल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. सेनेच्या या खोडसाळपणा विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची खरी क्लीप उद्या माध्यमांसमोर आणणार असल्याच महाजने यांनी स्पष्ट केले.

ही क्लिप किती खरी – किती खोटी, त्यात काही फेरफार करण्यात आलाय का, याची पडताळणी अद्याप झालेली नाही. पण या क्लिपमुळे भाजपाच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

  • मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप

एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केले पाहिजे? ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही.

आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे. हे त्यांना लक्षात आले पाहिजे. ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा. साम, दाम, दंड, भेद…

ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसे उत्तर दिले पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही. कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.

तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीने आणि खंबीरपणे मी उभा आहे. ‘अरे ला कारे’च करायचे ‘अरे ला कारे’ मध्येच उत्तर द्यायचे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

  • माधव भंडारी, मुख्य प्रवक्ते, भाजपा

पराभव समोर दिसू लागल्यामुळे सैरभैर झालेल्या शिवसेनेकडून अशा प्रकारची अर्धवट आणि एडिट केलेली आॅडीओ क्लीप दाखवली जात आहे. तंत्रज्ञानाचा निषेधार्ह गैरवापर असून या संदर्भात उद्या निवडणूक आयोगाकडे भाजपा तक्रार करणार आहेच पण त्या बरोबर खरी क्लीप उद्या भाजपा जाहीर करेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 कन्हैय्या कुमारसह १० जणांवर आरोपपत्र दाखल

News Desk

अमित शहांनंतर मुख्यमंत्री घेणार नितीन गडकरींची भेट

News Desk

आज पंतप्रधान मोदींची मुंबईत तर शरद पवारांची ठाण्यात प्रचार सभा

News Desk