मुंबई | मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याची संख्या वाढली आहे, असा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. राज्यात भाजपचे सत्तेत आल्यानंतर २०१५ मध्ये १४ वाघांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये १६ आणि २०१७ मध्ये तब्बल २१ वाघांचा मृत्यू असल्याचे निरुपम यांनी यावेळी म्हणाले आहे. निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन अवनी वाघीणच्या हत्यावरून भाजप सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन अवनी वाघिणी हत्येप्रकरणावरून मुनगंटीवार यांचा खरपूस समाचार केला आहे.
निरुपम पुढे असे देखील म्हटले की, अवनी वाघीण हत्या प्रकरणी मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून हटवून त्यांच्यावर कारवाई करायला हावी. तसेच याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली आहे. शिवाय, मुनगंटीवार हे आंतरराष्ट्रीय शिकारी माफियासोबत आहेत, त्याच्यासोबत ते पैसे कमवत आहेत, असा गंभीर आरोपदेखील निरुपम यांनी केला आहे. यात काही वाघांचा नैसर्गिक मृत्यूही झाला असावा. पण वाघांना ठार मारल्याच्या घटना पाहता सुधीर मुनगंटीवार हे शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांच्या टोळीत सामील असावेत, असे वादग्रस्त विधान निरुपम यांनी केले आहे.
LIVE: Press Conference exposing how Forest Minister Sudhir Mungantiwar allowed poaching of tigers in tiger reserves https://t.co/Cmx2SjliBw
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 10, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.