HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदी २ दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर

देहरादून | देशातील लोकसभा निवडणुकांच्या अंतिम टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी (१७ मे) थंडावल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी संध्याकाळी गेल्या ५ वर्षातल्या कार्यकाळातली पहिली पत्रकार परिषद घेतली. तर शनिवारपासून (१८ मे) पुढचे २ दिवस पंतप्रधान मोदी उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी मोदी उत्तराखंडमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर ते केदारनाथला गेले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी केदारनाथ मंदिरात जाऊन विधीवत पूजा केली आहे. पंतप्रधान मोदी केदारनाथनंतर सोमवारी (१९ मे) बद्रिनाथला जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मंदिरात पूजा करून झाल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालत तेथे उपस्थित भाविकांना अभिवादनही केले. यावेळी मोदींनी इथला पारंपरिक वेश देखील परिधान केला आहे. दरम्यान, गेल्या ५ वर्षांतील हा पंतप्रधान मोदींचा केदारनाथचा चौथा दौरा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी

Aprna

ममता ‘बंगालदुर्गा’ तर पंतप्रधान मोदी ‘महिषासुर’ !

News Desk

आनंद शिंदे, आदर्श शिंदे शिवसेनेतून नव्हे तर “या” पक्षातून निवडणूक लढविणार

News Desk