मुंबई | लोकसभा निवडणुकांच्या निकालाला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एका वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, मोदी नागपूर येथील संघमुख्यालयात भागवत यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसऱ्या बाजूला संघाचे सरकार्यवाहक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर मोदी यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग खडतर असल्याचे अनेक लोकांनी बोलून दाखवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भाजपला बहुमत न मिळाल्यास आणि आघाडीचे सरकार बनवण्याची वेळ आल्यास मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असे सांगितले होते. त्यामुळेच जर बहुमत मिळाले नाही, तर पक्षाची रणनिती काय असू शकते ? यावर कदाचित मोदी आणि भागवत यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.
दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी हे जर पंतप्रधानपदाचे दावेदार नसतील तर दुसरा कोणता नेता असेल ? यावर सातत्याने चर्चा केली गेली आहे. यावेळी वारंवार नितीन गडकरी यांचे नाव पुढे आले. मात्र स्वतः नितीन गडकरी यांनी या चर्चांना फेटाळले आहे. “पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार मी काम करणार”, अशी शिस्तप्रिय भूमिकाही त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. मात्र आता मोदी आणि मोहन भागवत यांची संभाव्य भेट होण्याआधीच संघाचे कार्यवाह भैयाजी जोशी यांनी गडकरी वाड्यावर जाऊन गडकरी यांची भेट घेतली असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.