HW News Marathi
राजकारण

शरद पवार नौ दो ग्यारह हो गये, पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

अकलूज | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (१७ एप्रिल) माढा मतदारसंघातील अकलूज येथे जाहीर सभा सुरू आहे. मोदींनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेचे सर्वेसर्वा शरद पवार जोरदार टीकास्त्र सोडले. शरदरावांनी माढ्याचे मैदान का सोडले, हे आता आपल्याला समजले. शरद पवार खेळाडू असून ते हवेचा रोख लगेच ओळखतात. ते आपले नुकसान कधीही होऊ देत नाहीत. यासाठी ते ‘नौ दो ग्यारह’ झाले, मोदींनी माढाच्या प्रचार सभेतून पवारांवर निशाणा साधला.

मोदींच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील व्यासपीठावर उपस्थितीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अकलूज हा राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मोहिते पाटील यांच्या हेजरी उतरी त्यांचा भाजप प्रवेश असेल तरी त्यांचा भा आता मोदी सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोदींच्या भाषणतील महत्त्वाचे मुद्दे

  • ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी कामे केली. त्यांना साखरेसोबतच इथेनॉल निर्मितीसाठी मदत केली आहे. बायोफ्युएलवर काम केले आहे…
  • मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी पाऊले उचलली गेली आहे
  • कारण तुम्ही फक्त दिल्लीच्या एका परिवाराच्याकडे बघून त्यांच्यासाठी काम करत आहात…
  • मोदींच्या विरोधात बोलण्याचा हक्क शरद पवार यांना आहे, ते वयाने मोठे आहेत. परिवाराने मी प्रेरित आहे, पण भगतसिंग-सुखदेव-फुले-आंबेडकर-सावरकर यांच्या परिवाराकडून मी शिकतो. पण शरद पवार तुम्ही तुमच्या गुरूकडून देखील शिकू शकला नाहीत.
  • गरीब, दलित, तळागाळातील समाजातील लोकांना अपमानीत करणाऱ्यांना तुम्ही शिक्षा करणार करणार ना…
  • तळागाळातील पूर्ण समाजाला अपमानीत करत आहेत
  • देशात काँग्रेसचे नामदार चौकीदाराला चोर म्हणून अपमानीत करत आहेत
  • काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या डोक्यात विकास नाही, तर फक्त मोदी हटाव एवढेच सुरू आहे
  • मला शिवरायांच्या, पांडुरंगाच्या, आई भवानीच्या भूमीतून आशीर्वाद पाहिजे. तुमच्या आशीर्वादामुळेच हे शक्य आहे.
  • शरद पवारांचे रॉल मॉडले दिल्लीचे गांधी कुटुंबिय आहे
  • मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही
  • खालची जात असल्यामुळे मला बदनाम करण्याचा काँग्रेस करत आहे
  • काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी माजी जात काढतात
  • दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले पाहिजे, ते आमच्या सरकारने केले आहे
  • देशात मजबूत सरकार असल्याने दहशतवाद्यांना थारा मिळत नाही
  • मी पाच वर्षांत काय केले ते तुम्हाला चांगले माहीत आहे
  • मजबूत निर्णय घेण्यासाठी मजबूत नेता पाहिजे
  • २०१४ मध्ये तुम्ही मला पूर्ण बहूमत दिले, त्यामुळेच मी देशासाठी मोठे आणि महत्वाचे निर्णय घेऊ शकलो
  • म्हणून पवारांनी मैदान सोडले
  • शरद पवार हे स्वत:वर किंवा त्यांच्या कुटुंबावर पराभवाचे खापर फुटू देत नाहीत, पुढे काय घडणार हे त्यांना चांगले कळते
  • आजची ही विराट सभा पाहून मला कळले की शरद पवार यांनी मैदान का सोडले
  • विजयसिंह मोहिते पाटील यांचे स्वागत करण्याचा मला सन्मान मिळाला म्हणून आभार मानतो
  • सरकार शेतकऱ्यांसोबत उभे आहे
  • अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे, मी अधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश दिले आहेत
  • देवीदेवता, संतांच्या वंदनाने भाषण सुरू केले
  • एक अरबी समुद्र हा मुंबईत आहे, पण दुसरा जनसागर इथे अकलूजमध्ये पाहायला मिळत आहे
  • मराठीतून भाषणाला सुरुवात
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात
  • मोदींची ही विराट सभा
  • मोदींनी ऊसाच्या शेतकऱ्यांना दिलासा देणार निर्णय घेतले
  • पंतप्रधान मोदी अकलूजमध्ये दाखल
  • अकलूजमध्ये महायुतीच्या सभेला प्रचंड गर्दी
  • महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज येथे सभा

Related posts

#LokSabhaElections2019 : गोव्यात शिवसेना-भाजपची युती नाही !

News Desk

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Aprna

KarnatakaByElection2018 : कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव

News Desk