HW Marathi
राजकारण

अहमदनगरच्या जागेसाठी राहुल गांधी मध्यस्थी करणार ?

नवी दिल्ली । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने गुरुवारी (७ मार्च) पहिली यादी जाहीर केली होती. यात १५ उमेदवारांच्या जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. यानंतर आता महत्त्वाच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. त्यापैकी अहमदनगरच्या जागेवरून दोन्ही पक्षात तिढा निर्माण झाला आहे. यावर मार्ग काढण्यासाठीकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दिल्लीत सोमवारी (११ मार्च) आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मध्यस्थी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी  इच्छु आहेत. परंतु त्यांनी राष्ट्रवादीकडून ही जागा लढवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जागांवरुन अजूनही आघाडीमध्ये अंतिम निर्णय झालेला नाही. यावर दिल्लीच्या बैठकीत तोडणार निघणार असल्याचे म्हटले जात आहे.
डॉ. सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. शनिवारी (९ मार्च) त्यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांसोबत हेलिकॉप्टरने एकत्र प्रवास केल्यानंतर या चर्चेला उधाण आले. त्यामुळे नगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला न सोडल्यास सुजय विखे पाटील भाजपची वाट धरतील असल्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक शनिवारी रात्री मुंबईत पार पडली.

Related posts

साध्वी प्रज्ञा यांची तब्येत आता ठीक असेल तर त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवा !

News Desk

आयएनएस सुमित्रावर अक्षय कुमारला घेऊन जाणे बरोबर आहे का ?

News Desk

पायलटसह ज्योतिरादित्य यांचे माल्ल्याने केले अभिनंदन

News Desk