HW News Marathi
राजकारण

राहुल गांधीचे ‘डीएनए’ खराब, भाजप नेत्याची जीभ घसरली

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत बोलताना भाजपचे कॅबिनेट मंत्री राम बिलास शर्मा यांची जीभ चांगलीच घसरली आहे. “राहुल गांधीचे ‘डीएनए’ खराब आहे”, असे अत्यंत वादग्रस्त विधान राम बिलास शर्मा यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकांचे सर्व टप्पे पार पडले आहेत, प्रचार संपला आहे. आता सर्वांना केवळ निकालाची प्रतीक्षा आहे. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सर्वच राजकीय नेत्यांनी एकमेकांवर प्रचंड टीका केली. त्याचप्रमाणे, प्रचारादरम्यान एकापाठोपाठ एक वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून भाजप नेत्यांनी पक्षाला अडचणीत आणले. मात्र, ही मालिका निवडणुकांनंतरही सुरूच असल्याचे दिसते.

“माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे इंदिरा गांधी यांना देवी म्हणून संबोधत होते . मात्र, राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींना वारंवार चोर म्हणतात. हा खराब ‘डीएनए’चा परिणाम आहे”, असे वादग्रस्त वक्तव्य शर्मा यांनी केले आहे. ते राहुल गांधींसंबंधीच्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. या निवडणुकांदरम्यान राज्यातच आणि संपूर्ण देशात प्रचाराची भाषा आणि पातळी अत्यंत खालावली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक, अश्लील खालच्या पातळीच्या टीका केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरेंची भेट घेणार !

News Desk

धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे सवलती मिळणार | मुख्यमंत्री

News Desk

जर मोदी जन्मतः ओबीसी असते तर संघाने त्यांना पंतप्रधान होऊ दिले असते का ?

News Desk