HW News Marathi
राजकारण

सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही ठरवितात !

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच भाजपच्या आयटी सेल सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या खोट्या बातम्या त्यांची देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्यानंतर आज (२३ एप्रिल) मुंबईतील पहिली जाहीर सभा घेण्यता आली. मोदी है तो मुमकिन है म्हणत मोदी फॉर न्यू इंडियाच्या फेसबुक पेजवर भाजपकडून एका कुटुंबीयांचा फोटो वापरत खोटी जाहिरात करण्यात होता. भाजपकडून एका कुटुंबाचा फोटो टाकत आम्ही कशी गरिबी हटवली याचा प्रचार केला जातोय. हे संपूर्ण कुटुंब राज ठाकरे यांनी मंचावर बोलवून भाजपची पुन्हा एकदा पोलखोल केली.

या सभेदरम्यान उद्योगपती मुंकेश आंबानी यांनी काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दर्शविता यांचा अर्थ का?, सरकारी कंपनीनाल डावलून अनिल अंबानीच्या यासारख्या नवख्या विमान कंपन्यांन कसे?, मोदी शरीफांना केक भरवितात, तेव्हा शहीद झालेल्या जवानांच्या मातांना काय वाटेल ?, अधी सूचना दिल्या असताना जवानांच्या गाड्या त्या रस्त्याने कशा गेल्या ?, अशा अनेक प्रश्नांच्या भडीमार राज ठाकरे यांनी केला आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, भाजपावाले माझे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाभाडे काढलेले व्हिडीओ बाहेर काढत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होते, त्यावेळी ते चुकले म्हणून त्यांचे वाभाडे काढले, आता हे सत्तेत हे वाट लावत आहेत, म्हणून ह्यांचे वाभाडे काढत आहेत, माझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं भाजपाकडे नाहीत म्हणून अशाप्रकारे भाजपाकडून टीका करण्यात येत आहे.

 

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • वारे फिरलेले आहे, मुकेश आंबानी बोलेलेच आहे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दशाचे संकट आहे
  • हा कसला फकीर पंतप्रधान हा बेफिकीर पंतप्रधान!
  • पुलवामाची दुर्घटना घडल्यानंतर मोदी हसऱ्या चेहऱ्याने जगभर फिरत होते
  • अधी सूचना दिल्या असताना जवानांच्या गाड्या त्या रस्त्याने कशा गेल्या ?
  • सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना मोदी देशद्रोही ठरवितात
  • सवाशे कोटीचे राफेल विमान
  • सरकारी कंपनीनाल डावलून अनिल अंबानीच्या यासारख्या नवख्या विमान कंपन्यांन कसे?
  • ऐवढे देश फूरुण आले, ते कशासाठी लहानपणीची इच्छा होती का, की मोठा झाल्यानंतर फिर फिर फिरेन
  • भाजपने खोटेपणाचे आकडे सांगत, बाता मारत, देशाची पाच वर्षे वाया घालवली
  • भाजपच्या आयटी सेलच्या खोट्या बातम्या राज ठाकरेंकडून भरसभेत पंचनामा
  • भाजपच्या आयटी सेलमधील लावारीस कार्टी काहीही खोट्या बातम्या पेरतात
  • मोदी शरीफांना केक भरवितात, तेव्हा शहीद झालेल्या जवानांच्या मातांना काय वाटेल ?
  • मोदींनी पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधीला का बोलवले?
  • उद्योगपीत मुकेश आंबानी काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा देता याचा अर्थ का ?
  • मुकेश आंबानी काँग्रेसच्या बाजूने असताना, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे मात्र भाजपच्या बाजूने
  • मोदींना शरद पवारांमध्ये गुरू दिसत होता, आणि आता त्यांच्यावर टीका करत आहे
  • २०१४ सारखी लाट नाही, म्हणून भाजप नेते काही बोलतात.
  • गुजरात विधानसभेत भाजपचे १६५ जागा यायला हव्या होत्या ,पण आले ९९…. नरेंद्र मोदींच्या स्वतःच्या मतदारसंघात हि अवस्था असेल तर देशात काय होईल याचा अंदाज घ्या
  • गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रत्येक निवडणूक ही भाजपसाठी पानिपत होते, प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा विजय
  • गेल्या दीड वर्षापूर्वी गुजरातीची विधानसभेचे निवडणूक झाली, त्यावेळी गुजरातमध्ये मोदी लाट ओसरलेले चित्र दिसून येत आले
  • भाजप नेत्यांमध्ये खोटे बोलण्याची स्पर्धा लागली आहे, काही बरळतात.
  • शरद पवारांच्या दिल्लीच्या घराचे दरवाजे वाजविणाऱ्या भाजप नेत्यांची नावे सांगू का ?
  • माझ्या टीकेमुळे मुख्यमंत्री भांबावले आहेत.
  • मी काँग्रस आणि राष्ट्रवादीचे कातडे सोलेले, आता भाजपचे कापडे काढणार
  • अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे मी काँग्रेसचे वाभाडे काढेल होते. यानंतर तर भाजपची सरकार आली
  • भाजप आता माझे व्हिडिओ दाखविणार आहे, परंतु मी काँग्रेसवर भाजपपेक्षा जास्त टीका केली आहे
  • माझी स्क्रिपट बारामतीतून येते, मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मला चालवितात.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरा आराम मिळाला असेल.
  • दोन दिवस भाषणामध्ये विश्रांती घेतली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरेंना जे जमले नव्हते, ती किमया…” तानाजी सावंतांचे मोठे विधान

Aprna

शिंदे गट-शिवसेना राडा प्रकरणी पोलिसांनी सदा सरवणकरांची पिस्तुल केली जप्त

Aprna

आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सरकारने प्रश्न सोडवावेत! – अजित पवार

Aprna