HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरेंना जे जमले नव्हते, ती किमया…” तानाजी सावंतांचे मोठे विधान

मुंबई | “ज्या मैदानात स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचच्या सभा तिथे झाल्या. परंतु, त्यांच्या सभांनाही मैदान भरेपर्यंत गर्दी जमली नाही. परंतु, तिथे सावंत बंधूंनी सात लाख लोकांचा मेळावा भरवून करून दाखवली”, असे वक्तव्य राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केले आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगूल लागल्या आहेत. तानाजी सावंत यांनी मंगळवारी (28 मार्च) वडार समाज मंदिराच्या उद्घाटन समारंभात हे वक्तव्य केले.  या वक्तव्यामुळे तानाजी सावंत यांना त्यांच्या पक्ष आणि भाजपचा रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली आहे.

तानाजी सावंत म्हणाले, “आपल्या सोलापूर जिल्ह्यातील किंवा तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहिती होते. जे पटांगण आपण सभेसाठी घेतले होते. ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना ही भरले नाही. आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याही सभा झाल्या. त्यांनाही भरले नव्हते. आडवाणीजी यांनाही भरले नव्हते. आणि ती किमया या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी 2017-18च्या दरम्यान, 7 लाख लोकांचा मेळावा भरवून करून दाखविले.”

वडार समाज मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी तानाजी सावंत यांनी हजेरी लावली होती. हा समारंभ ठरलेल्या वेळेपेक्षा चार तास उशिरा कार्यक्रम सुरू झाला. या समारंभादरम्यान आरोग्यमंत्र्यांनी सोलापूरचे पालकमंत्री केल्यानंतर किती अनुदान मिळाते. ते दाखवून दिले, असे म्हणत तानाजी सावंतांनी भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील चिमटा काढला.

 

Related posts

कोरोना बाधित पत्रकारांच्या उपचाराचा खर्च आणि नुकसान भरपाई माध्यम समुहांनी द्यावी

News Desk

प्रज्ञा सिंह ठाकूरला दिलासा, निवडणूक लढवण्याविरोधातील याचिका फेटाळली

News Desk

हा बंद म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद – देवेंद्र फडणवीस

News Desk