HW News Marathi
राजकारण

राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही, सोडू देणार नाही !

मुंबई |राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच,”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्दावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढे उद्धव ठाकरे असे देखील म्हणाले की, कुभ कर्णाला जागे करण्यासाठी अयोध्येला गेलो होतो. जोपर्यंत राममंदिर बांधणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. कुंभकर्ण वेळत जागा झाला नाही, तर हिंदु पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. अयोध्येनंतर आम्ही आता पंढरपूरात कुंभकर्णाला जागे करण्यासाठी आलो आहे.

“तुम्ही आमच्या हिंदु देवतांच्या नावाचे राजकारण करून नका. आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही”, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सभेच्या शेवटी भाजपला इशारा दिला आहे. तसेच सोहराबुद्दीन शेखचा फेक एन्काउंटर प्रकरणी सर्व जणांची सुद्धा निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. परंतु, बाबरी मशीद पाडणाऱ्यावऱ्या कारसेवकांवरील गुन्हे आजही कायम आहेत. तुम्हाला वाटते तर तुम्ही त्यांच्यावरील केस त्या कारसेवकांची मुक्तता करा.

गेल्या ३० वर्षापासून अयोध्येचा मुद्दा कोर्टात रखडला आहे. हे तुम्हा बाबरी मजीद पाडताना लक्ष्यात नाही आले. परंतु राम मंदिर बांधताना तुम्ही सांगता की, राम मंदिराचा मुद्दा कोर्टा असल्याची आठवण येते. पंढरपुरातील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी शेतकरी, पीक विमाव योजना, दुष्काळ अशा विविध मुद्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विजयी खासदारांसह उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतले श्रीरामाचे दर्शन

Atul Chavan

लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया! – मुख्यमंत्री

Aprna

‘थापा’ मारुन राज्य करण्याचे ‘स्किल’ सरकारने कमावले | उद्धव ठाकरे

News Desk
देश / विदेश

देश भाजप नाही आरएसएस चालवत आहे | सावित्रीबाई फुले

News Desk

लखनऊ | भारतीय जनता पार्टीमधून राजीनामा दिल्यानंतर खासदार सावित्री बाई फुले यांनी रविवारी (23 डिसेंबर) रोजी रमाबाई आंबेडकर मेळाव्याच्या जागेवरुन झालेल्या सार्वजनिक सभेत भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले की देश आरएसएस चालवत आहे. सावित्री बाई फुले म्हणाल्या की जेव्हा त्या भाजपामध्ये होत्या तेव्हा त्यांना लोकसभेत त्यांचे मत माडण्याची परवानगी नव्हती.

काही मंत्री, आमदार आणि आरएसएस प्रमुख यांच्याकडून ऐकायला मिळत आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय राज्यघटना बदलली जाणार आहे. त्या म्हणाल्या आरक्षण बंद करण्यात येणार आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर संविधानाच्या प्रती जाळण्यात आल्या. आम्ही आमचा हक्क मागणार नाही तर हिसकावुन घेणार आहोत. फुले म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही संविधान आणि आरक्षण वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. फुले म्हणाल्या, ब-याच वर्षांपासून संविधानानुसार दिलेले आरक्षण राबविण्याची मागणी मी करत आहे. त्याच वेळी त्यांनी पंतप्रधानांना पहारेकरी नाहीतर भागीदार असल्याचे म्हटले आहे.

Related posts

“राज्यसभा निवडणुकीत ‘मविआ’चे सर्व उमेदवार विजयी होतील,” नाना पटोलेंचा विश्वास

Aprna

देशातील ४० व्या संचार उपग्रहाचे प्रक्षेपण

News Desk

भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

News Desk