HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले विठ्ठल-रखुमाईचे दर्शन

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (२४ डिसेंबर) पंढरपूर दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले आहे. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुळशीचा हार घालून सत्कार करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर भगवेमय झाल्याचे चित्र पंढरपुरात पाहायला मिळत आहे. अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा महत्वाचा दौरा मानला जात आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंढरपूरमध्ये उद्धव यांची सभाही सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. उद्धव ठाकरेंची महासभा आणि महाआरतीच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. उद्धव ठाकरे पंढरपूरात दाखल झाल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत , खासदार चंद्रकांत खैरे यांनी पंढरपुरात उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शरद पवारांनी राज ठाकरेंना टूरिंग टॉकीजसाठीची पुढची स्क्रिप्ट दिली

News Desk

EXIT POLL : छत्तीसगढमध्ये पुन्हा भाजपची सत्ता, काँग्रेस मात्र बहुमतापासून दूर

News Desk

भविष्यकाळात एससी, एसटीचे आरक्षण रद्द करणार का ?

News Desk
देश / विदेश

हरियाणात दाट धुक्यामुळे ५० गाड्यांचा अपघात

News Desk

नवी दिल्ली | हरियाणामध्ये दाट धुक्यामुळे ५० गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी (२४ डिसेंबर) घडली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहतक-रेवारी हायवेवर हा भीषण अपघात झाला आहे.

हायवेवर वेगाने येणाऱ्या दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यानंतर त्यामागे असलेली इतर वाहनेही एकमेकांवर आदळली. दाट धुके असल्याने हा अपघात झाला आहे. अपघात झालेल्या गाड्यांमध्ये शाळेच्या बसचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातातील मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Related posts

लायन एअरवेजचे विमान कोसळले

News Desk

छिंदमचे वकील पत्र स्वीकारणाल्याच्या अफवामुळे वकिलाला त्रास

swarit

अखेर विजय मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

News Desk