HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

रणजितसिंह मोहिते-पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

मुंबई | राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश उद्या (२० मार्च) प्रवेश करणार आहेत. रणजितसिंह मोहिते-पाटील हे उद्या दुपारी १२.३० वाजता भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार असल्याची माहिती मिळली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले असल्याचे म्हटले जाते.  माढा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलल्यामुळे रणजितसिंह यांनी राष्ट्रवादीने काँग्रेस राम राम ठोकणार आहे.

अकलूजमध्ये मोहिते-पाटील पितापुत्रांनी आज (१९ मार्च) कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यातच मोहिते-पाटील पितापुत्रांच्या भाजप प्रवेशावर असल्याचे निश्चित झाले आहे. या मेळाव्यात तब्बल पाच हजार कार्यकर्त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली होती. मेळाव्यात उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांना बिनधास्तपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला. “तुम्ही फक्त निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असा विश्वास मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

 

 

 

 

Related posts

शिवसेनेचा मनसेवर कार्टून वॉर | तुम्ही अंथरून सोडण्याआधी कार्यकर्ते पक्ष सोडतायत

News Desk

प्लास्टिक बंदी पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की पर्यावरणाच्या रक्षणासाठी – नवाब मलिक

राज्यात जनतेवर विषप्रयोग करणारे सरकारः खा. अशोक चव्हाण

News Desk