HW News Marathi
राजकारण

#Results2018 : चंद्रशेखर राव ५० हजार मतांनी विजयी

नवी दिल्ली | तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांना सत्ता राखण्यात यश आले आहे. चंद्रशेखर राव यांचा तब्बल ५० हजार मतांनी विजय झाला आहे. एक्झिट पोलमध्ये टीआरएसला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत टिआरएसला ८६ जागांवर आघाडी मिळाली आहे. तेलंगणाच्या निर्मीतीत चंद्रशेखर राव यांचा सिंहाचा वाटा असून राज्यातील राजकारणावर त्यांची पकड मजबूत झाले आहे.

त्यामुळे ते सत्ता काबीज करतील सर्वांच्याच अंदाजतून व्यक्त करण्यात आले होत. ६० हा बहुमताचा आकडा चंद्रशेखर राव यांनी हासील केला आहे. तर कॉंग्रेस आणि तेलगू देसम पार्टीला २२ आणि भाजपला केवळ ३ जागांवर तर इतर ८ जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणातील ११९ जागांसाठी सर्वच पक्षांच्या मिळून १८२१ उमेदवारांचे राजकीय भविष्य मतदान यंत्रात कैद झाले आहे.

पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या तेलंगणा राज्याची विधानसभा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भंग केली होती. त्यानंतर या निवडणुका घेण्यात आल्या. गेल्या निवडणुकीत केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला ६३ जागा मिळाल्या होत्या. दरम्यान, तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभानंतरही भाजप भुईसपाट झाल्याची दिसून येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपुमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे

News Desk

पंकजा मुंडे घेणार सावरगावात दसरा मेळावा

News Desk

ज्यांच्या रक्तात भारत आहे ते एअर स्ट्राइकवर संशय घेतील का ?

News Desk