HW News Marathi
राजकारण

“आमची निष्ठा उद्धवसाहेबांसोबतच”, शिंदे गटाच्या दबावाच्या चर्चांवर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | “आमची जी  निष्ठा आहे ती उद्धवसाहेबांसोबतच आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rituja Latke) यांनी शिंदे गटाकडून येणाऱ्या दाबावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ऋतुजा लटकेंना शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याचा दबाव देण्यात येत असल्याच्या चर्चा आज (12 ऑक्टोबर) सकाळपासून सुरू आहेत. यावर  ऋतुजा लटकेंनी मुंबई महानगरपालिका कार्यालयात पत्रकारांशी बोलताना शिंदे गट आणि निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

शिंदे गटात जाण्याच्या चर्चेवर  ऋतुजा लटकेंनी माध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “तुम्ही माझ्याकडे बघून तुम्हाला काय वाटते की माझ्यावर दबाव आहे. पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी भेटल्याची माहिती खोटी आहे. आमची जी  निष्ठा आहे ती उद्धवसाहेबांसोबतच आहे. माझे पती रमेश लटके त्यांची निष्ठा देखील उद्धवसाहेब आणि बाळासाहेबांवर होती. मी आता महापालिका आयुक्तांच्या भेट घेणार आहे. मी पुन्हा एकदा राजीनाम्याबाबत विनंती करणार आहे, की मला आजच्या आजच राजीनामा देण्यात यावा.”

शिंदे गटावर अनिल परबांचे आरोप

“ऋतुजा रमेश लटकेंना (Rituja Ramesh Latke) शिंदे गटाकडून लढण्यासाठी दबाव टाकला जात आहे”, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटा आणि ऋतुजा रमेश लटकेंच्या राजीनामावर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांवर दबाव असल्याचे देखील पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले आहे. अनिल परब म्हणाले, “शिंदे गटाकडून ऋतुजा रमेश लटकेंना मंत्रिपदाची ऑफर देणे चालू आहे. परंतु,  आम्हाला पूर्ण खात्री आहे की, रमेश लटके यांचे कुटुंब हे शिवसेनेशी अतिशय प्रामाणिक आहे. शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या दबावाला ते कुठेही बळी पडणार नाही, अशी आम्हाला खात्री आहे. याबाबतीत आम्ही सतत मागणी करतोय की, मी आयुक्तांना, असे देखील सांगितले. तुम्ही मला असे लिहून त्या आपण ऋतुजा रमेश लटकेंचा राजीनामा का मंजूर करत नाही. त्याचे कारण दिले तर आम्हाला पुढे त्याबाबती विचार करता येईल. परंतु, ते कारण देखील त्यांनी आजूनपर्यंत दिलेले नाही. निवडणुकीचे अर्ज भरण्यास पुढेचे दोन दिवस बाकी आहेत. जाणून भुजून रमेश लटकेंच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला काढण्यासाठी किंवा शिंदे गटा घेण्यासाठी हा त्यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. याचा आम्ही निषध करतो.”

 

संबंधित बातम्या

 

“ऋतुजा रमेश लटकेंना शिंदे गटाकडून निवडणूक लढण्यासाठी दबाव”, अनिल परबांचा आरोप

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर; ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही ठरवितात !

News Desk

पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

News Desk

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस भाजपला वरचढ ठरणार ?

News Desk