मुंबई | राष्ट्रवादीचे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज (१४ सप्टेंबर) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. “साहेब उदयनराजेंवर तुम्ही मनापासून प्रेम केले. साताऱ्यातल्या आपल्या जवळच्यांना दुखावलत. त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलत पोटच्या पोरावानी प्रेम केलेत. खरंतर तुमचा स्वभाव तसा नाही. साहेब तुम्हाला काय मिळाले ?”, असा सवाल उपस्थित करणारे ट्विट करत आव्हाड यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावरून टीका केली आहे.
साहेब उदयनराजें वर तुम्ही मानापासून प्रेम केले सतारातल्या आपल्या जवळच्याना दुखावलत
त्यांच्या सगळ्या आचरट बालिश चाळयांना पाठिशी घातलत पोटच्या पोरावणी प्रेम केलेत
खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही #साहेब काय मीळाले?
पण तरीही
“यशवंतरावांचा सातारा जिल्हा
शरदपवारांचा बालेकिल्ला”
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 14, 2019
“तुम्ही त्यांच्या सगळ्या आचरट, बालिश चाळयांना पाठिशी घातलत. पोटच्या पोरावानी प्रेम केलेत. खरा तर तुमचा स्वभाव तसा नाही. साहेब तुम्हाला काय मिळाले ? पण तरीही यशवंतरावांचा सातारा जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला”, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे भाजप-शिवसेनेत प्रवेश सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आपले प्रेम कायम असल्याचे सांगत प्रत्येक राष्ट्रवादीचा नेते शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी अनेकदा या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांच्या राजीनाम्याच्या आणि भाजप प्रवेशाच्या चर्चा ज्यावेळी रंगू लागल्या होत्या त्यावेळी प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी अशीच संतप्त प्रतिक्रिया दिली होती. “गणेश नाईक यांनी पक्षाची वाट लावली आहे. ते ५ वर्षांत पक्ष साफ करतील आणि आयत्या वेळी पक्ष सोडून जातील असे मी वारंवार सांगितले होते. परंतु, पक्षाने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. अखेर मी जी भीती व्यक्त केली होती तेच झाले आहे”, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.