HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

सांगलीची जागा स्वाभिमानीला, गरज पडल्यास काँग्रेसच्या इच्छुकाला देण्याची तयारी

सांगली | सांगलीची जागा ही अखेर स्वाभिमानी शेतटकरी  संघटनेला मिळाली आहे. लवकरच या मतदार संघाच्या उमेदवारीची घोषणा करू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले आहे. परंतु जर गरज पडली तर काँग्रेसच्या इच्छुका ही जागा देऊ असे देखील शेट्टी म्हणाले.

राष्ट्रवादी-काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आला. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आघाडीकडे वर्ध्यासह बुलढाणा आणि हातकणंगले या तीन जागांची मागणी केली होती. त्याचप्रमाणे, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सांगलीच्या जागेसाठी देखील आग्रही होती.

Related posts

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे निधन

News Desk

ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी उत्तम उमेदवार !

News Desk

राहुल गांधी आज अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार

News Desk