मुंबई | ‘ठाकरे’ या बहुप्रतीक्षित सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजित पानसे आणि शिवसेना खासदार आणि निर्माते संजय राऊत यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पानसे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर राऊत यांनी आज (२४ जानेवारी) एक ट्विट केले होते. “ठाकरे The Biopic… लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणी कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे.” अशा शब्दात राऊत यांनी टीका केली आहे. या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या ट्विटमध्ये राऊत यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी ‘ठाकरे’ चित्रपटाचा जाणीवपूर्वक उल्लेख केला आहे. या सगळ्याचा संबंध दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्याशी झालेल्या वादाशी जोडला असता प्रथमदर्शनी तरी हे ट्विट त्यांनाच उद्देशून असल्याचा अनेकांचा अंदाज आहे. मात्र, काही तासांमध्येच राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट डिलिट केले. एरवी एखादी भूमिका घेतल्यानंतर शिवसेना किंवा संजय राऊत सहजासहजी माघार घेत नाहीत. त्यामुळे राऊत यांनी हे ट्विट काढून टाकण्यामागील खरे कारण काय, यावर नव्याने चर्चा सुरु झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.