सातारा | उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशांतर आज शरद पवार पहिल्यांदा सातारा मध्ये आले . सातारा मध्ये आल्यांनतर शरद पवार उदययनराजेंवर काय बोलणार अशी उत्सुकता लागली होती. सातारा मध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन आज राष्ट्रवादीकडून करण्यात आले. या शक्तिप्रदर्शातून आज राष्ट्रवादीकडून उदयनराजेंच्या भाजपमध्ये जाण्याने आम्हाला काही फरक पडला नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला .
आज शरद पवार यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उदयनराजेंच्या समाचार घेतला .उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक पगडी भाजप नेत्यांच्या डोक्यावर घातली. आधी भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ..
आजच्या भाषणात शरद पवार भाषणाला उभे राहिले आणि आपल्या शेजारी पगडी घालून उभ्या असणाऱ्या तुतारीवाल्याला त्यांनी एकच प्रश्न केला , काय रे गेल्या आठवड्यात दिल्ली ला जाऊन काही लोकांनी पगड्या घातल्या ,तुलापण त्यांनीच घातली का ? शरद पवार यांच्या या वाक्यावर संपूर्ण सभेमध्ये हशा पिकला .उदयनराजेंचं नाव न घेता त्यांनी उदयनराजेंना टोला लगावला
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.