परभणी | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेतील संचालक मंडळाने आणि कर्ज मंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांचे संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ईडीच्या याच कारवाईच्या निषेधार्थ आज म्हणजेच गुरुवारी (२६ सप्टेंबर) परभणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीच्या वतीने दाखल केल्याल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ बुधवारी (२५ सप्टेंबर) बारामती आणि पुण्यात बंद पाळण्यात आला होता. तर आज याच पार्श्वभूमीवर परभणी शहरात पाळण्यात बंद पाळण्यात आला. त्यामुळे परभणी शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परभणी शहरातील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दीपके यांनी
काय आहे प्रकरण ?
राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या काळात राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार घोटाळा झाला होता. राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या बँकेतील संचालक मंडळाने आणि कर्ज मंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांचे संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केले होते. २०११मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे समोर आली होती. आणि आता या प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही नाव समोर आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. १९६१ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी सूतगिरणी आणि साखर कारखान्यांसाठी कोट्यावधींची कर्ज दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.