HW News Marathi
राजकारण

…तर मी शहांना भेटायला गेल्याच्या बातम्या येतील !

मुंबई | “काल रात्री माझे जीभ आणि गळ्याचे ऑपरेशन झाले आहे. डॉक्टरांनी मला काही दिवस बोलू नका असे सांगितले आहे. मग म्हटले सध्याचे राजकारण पाहता मी आज कार्यक्रमाला गेलो नाही तर पत्रकार परिस्थिती मी गिरीश महाजन यांच्याबरोबर अमित शहा यांना भेटायला गेलो. म्हणून थोडा त्रास झाला तरी मी आलो,” असे सूचक विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. पवारांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हर्षा फुलला.

माजी सहकारमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी (३० जुलै) मुंबईतील विधानभवनात पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेते उपस्थित होते.

हल्ली सभागृहात वेगळाच पायंडा पाडला जात आहे. माझ्या संसदीय व विधिमंडळातील ५२ वर्षांच्या कार्यकालात मी कधीही माझा बाक सोडला नाही. संसदेची गरीमा सांभाळण्याची काळजी आम्ही घेतली. दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही, असे म्हणत पवार यांनी संसदेतली महिलांवर केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह टीप्पणीवर निशाणा साधला. पुढे पवार म्हटले की, माझ्यासमोर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि एस. एम. जोशी यांचा आदर्श होता.

या व्यासपीठावर मुख्यमंत्री देकेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही सभागृहांचे सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संसदीय कार्यमंत्री विनोद ताकडे, परिवहनमंत्री दिकाकर रावते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण तसेच छगन भुजबळ, दिलीप कळसे- पाटील आदी दिग्गज उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१०० दिवसांत मोदी सरकारपासून देशातील जनता मुक्त होईल !

News Desk

हौसाबाई आठवले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी वाहिली आदरांजली

News Desk

जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणारच – नारायण राणे

News Desk