HW News Marathi
राजकारण

शरद पवार यांची प्रचाराची भाषा खालच्या पातळीची !

मुंबई | “राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणूकीत त्यांच्या पायाखालची वाळूसरकलेली दिसत आहे”, अशी जोरदार टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज (२२ एप्रिल) केली आहे. “शरद पवार सध्या बुथ वरच्या सामान्य कार्यकर्त्यालाही फोन करुन माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर या प्रकारची भाषा वापरत आहेत, याचाच अर्थ सुप्रिया सुळे यांचे बारामतीमध्ये काही खरे नाही. हे बहुधा त्यांना कळले असावे”, असा टोलाही विनोद तावडे यांनी यावेळी लगावला आहे.

“शरद पवार यांच्या मुलीचे काय होईल, अजितदादांच्या मुलाचे काय होईल ? मुलायम सिंह यांच्या मुलाचे काय होईल ? याचा विचार करु नका, तर आपल्या मुला बाळांचे काय होईल याचा विचार करा, त्यांच्या भविष्याचा विचार करुन लोकांनी मतदान कराव असे आवाहन करताना या राजकीय नेत्यांनी आपापल्या मुलाबाळांसाठी भरपूर संपत्ती गोळा करुन ठेवलीय. त्यामुळे आपापल्या मुलांचे भले करायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्वच निवडून दिल पाहिजे”, असेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

“राज ठाकरे यांच्या भाषणांचा राजकीय परिणाम निवडणूकीत काहीही होणार नाही. त्यांच्या भाषणातून फक्त सर्वांची चांगली करमणूक होत आहे. लाव रे व्हिडीओ असे सांगत आता लोक सोशल मीडियावर व्हिडीओ लावत आहेत. राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांना कसे टेम्पो धुणारे म्हटले होते. छगन भुजबळ यांच्यावर कशी टिका केली होती. शरद पवार यांच्याबद्दल आधी काय भाष्य केले होते. हे सगळे मनसेचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत”, असेही तावडे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात युतीसाठी झुकणार नाही !

News Desk

सर्वोच्च न्यायालयात 20 जुलैला एकनाथ शिंदे सरकारचे भविष्य ठरणार

Aprna

#Vidhansabha2019 | मनसेची पहिली उमेदवार यादी जाहीर

News Desk