HW News Marathi
राजकारण

शरद पवारांची मानसिकता राजेशाही, आम्ही मात्र जनतेचे सेवक !

मुंबई | “शरद पवार यांची मानसिकता राजेशाही असल्याचे दिसून येते. मात्र, मी जनतेचा सेवक आहे”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “मी माझ्या महाजनादेश यात्रेत लोकांपुढे आमच्या सरकारने गेल्या ५ वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोगा मांडत असताना शरद पवार टीका करतात कि आम्ही सत्तेत असताना हिशोब देण्यासाठी आमच्याकडे लेखनिक होता. पवारांच्या या वक्तव्यावरूनच लक्षात येते कि त्यांची मानसिकता राजेशाही आहे”, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

आगामी विधानसभेच्या निमित्ताने सध्या मुख्यमंत्री फडणवीस राज्यभर फिरून जनतेचा महाजनादेश घेत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस सध्या राज्यभर फिरून जनतेशी संवाद साधत आहे. त्याचप्रमाणे, गेल्या ५ वर्षांत फडणवीस सरकारने केलेल्या कामांचा हिशोब सध्या मुख्यमंत्री जनतेसमोर मांडत आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका करताना शरद पवार म्हणाले होते कि आम्ही सत्तेत असताना आमच्याकडे हिशोब देण्यासाठी लेखनिक होता. दरम्यान, शरद पवार यांच्या याच टीकेला आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्याचप्रमाणे, यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर देखील सडकून टीका केली आहे.

“आज राज्यात कॉंग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही”, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे यावेळी मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे भोसलेंच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला मोठा फायदा होणार असल्याचा पुनरुच्चार देखील केला आहे. “गेल्या निवडणुकीत आपल्यासोबत शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि मोदींजींचे नेतृत्व होते. आता आपल्यासोबत छत्रपतींचे वारस देखील आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला निश्चित मोठे यश मिळेल”, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या… आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

Aprna

तावडेंनी घेतली ठाकरेंची भेट

News Desk

“…म्हणून ‘पावर’काका मुख्यमंत्री होते”, गोपीचंद पडळकरांचे जितेंद्र आव्हाडांवर टीका

Aprna