HW News Marathi
राजकारण

स्वाभिमानीची ३ जागांची मागणी पूर्ण करण्यासाठी शरद पवारांचे विशेष प्रयत्न

आरती मोरे | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा बघता राष्ट्रवादीचा पहिल्या फळीतील नेत्यांनी म्हणजेच अजित पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना ही वर्ध्यासह बुलढाणा आणि हातकणंगले या तिन्ही जागांसाठी आग्रही असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची आज (२५ फेब्रुवारी) त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली .

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमध्ये बुलढाण्याचे रविकांत तुपकर त्याचबरोबर राष्ट्रवादीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार हे देखील उपस्थित होते. शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार बुलढाण्याची जागा राष्ट्रवादीची असल्याने त्याबाबत योग्य निर्णय राष्ट्रवादी घेईल. ती जागा कदाचित स्वाभिमानासाठी सोडण्यात येणायची शक्यता असल्याचे देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

वर्ध्याची जागा ही काँग्रेसची असल्याने ती जागा स्वाभिमानाला देण्यासाठी आधी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा करावी लागेल. वर्ध्यातील या जागेसाठी शरद पवार आज रात्री दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा करणार असून उद्या (२६ फेब्रुवारी) दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतील. त्यामुळे आता स्वाभिमानाची तीन जागांची मागणी पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे चित्र दिसत आहे.

“शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आघाडीत राहण्यासाठी सांगितले आहे. तसेच आघाडीमधून बाहेर पडू नका, मोदींना हरवायचे असेल तर आपल्याला आघाडी ठेवावी लागेल. आम्ही आपल्या मागण्या पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. आपल्याला एकत्र निवडणूक लढवावी लागेल”, असे मत देखील शरद पवार यांनी व्यक्त केले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप-शिवसेनाचा महामेळावा सुरू, भाषणात सीएसएमटी पूल दुर्घटनेचा उल्लेखही नाही

News Desk

विधानसभेकरिता काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर

News Desk

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आज थंडावणार

News Desk