HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा यांना पाटना साहिबमधून उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली | ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज (६ एप्रिल) काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना पाटना साहिब येथून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पाटना साहिब लोकसभा मतदारसंघामध्ये आता भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांच्या विरोधात शत्रुघ्न सिन्हा निवडणुकीच्या रंगणात उतरणार आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची यादी आज दुपारी प्रसिद्ध केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेतृत्वावर नाराज असलेले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी  काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. शत्रुग्न सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले की, ”भाजप हुकुमशाही पध्दतीने काम करु लागला आहे, वन मॅन शो झालाय. वन मॅन शो अ‍ॅन्ड इन टू मॅन आर्मी. हे दोघेजण मिळून पक्ष आणि सरकार चालवताहेत,” अशी शब्दात शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

 

Related posts

यंदा शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार !

News Desk

जैश-ए-मोहम्मदचा पुळका कोणाला आहे हे जगाला माहित आहे !

News Desk

राफेलवरून संसदेत गदारोळ, राहुल गांधींचा मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार

News Desk