HW News Marathi
राजकारण

Shekhar Gore Exclusive | मला आताच आमदार झाल्यासारखं वाटतंय !

माण-खटाव | राज्यात विधानसभेचे असे २ मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेनेची युती होऊनही या दोन्ही पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. त्यांपैकी पहिला म्हणजे कणकवली विधानसभा मतदारसंघ आणि दुसरा म्हणजे माण-खटाव विधानसभा मतदारसंघ. या माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्याशी बातचीत केली आहे एच.डब्ल्यू.मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी. “जयकुमार गोरे यांचा बंधू असणं हि माझी चूक आहे का ? माझ्यासाठी बंधू असणं हा मुद्दा महत्त्वाचा नाही. आमची लढाई वैचारिक आहे”, असे स्पष्ट मत शेखर गोरे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

इथे पाण्याच्याच जीवावर राजकारण खेळले जाते !

“मी राष्ट्रवादी पक्ष सोडला असे मी अजूनपर्यंत असे म्हटलेले नाही. मात्र, त्या लोकांनीच मला बाहेर काढले”, असे शेखर गोरे म्हणाले. “माण-खटावचा मुख्य प्रश्न,कायमस्वरूपीचा प्रश्न आहे तो पाण्याचा. गेली ३५ वर्षे इथे पाण्याच्या जीवावर राजकारण खेळले जाते. आताचे विद्यमान आमदार गेली १० वर्षे या पाण्याच्याच मुद्द्यावर राजकारण करत आहेत. अजूनही पुढच्या पंचवार्षिकला पाण्याचाच विषय घेऊन लढण्याचा प्रयत्न ते करत आहेत”, असे म्हणत शेखर गोरे यांनी जयकुमार गोरे यांना लक्ष्य केले आहे.

मला आताच आमदार झाल्यासारखं वाटतंय !

“२००९ साली जयकुमार गोरे आमदार झाले, २०१४ साली देखील ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. मी म्हणेन कि विकास खुंटला नाही तर त्या प्रतिनिधीने या माण-खटावसारख्या दुष्काळी भागात नुसती दहशत माजवली होती. ती दहशत या शेखर गोरे त्याच्या कार्यकर्त्यांच्या सोबतीने संपवली आहे, हे मी प्रामाणिकपणे आणि ठामपणे सांगू शकतो”, असे शेखर गोरे यावेळी म्हणाले. “सामान्यांची प्रचंड ताकद माझ्यासोबत आहे. मला आताच आमदार झाल्यासारखं वाटतंय”, असे प्रतिक्रिया देखील शेखर गोरे यांनी एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे संकल्पपत्र हे राष्ट्रीय भावनेचे संकल्पपत्र आहे !

News Desk

आधी स्वतःच घर सांभाळा, त्यानंतर देश सांभाळा !

News Desk

तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आला आहात, फेसबुकसारख्या माध्यमाचा दळभद्री वापर सुरू असेल तर….

News Desk