HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांवर गुन्हा दाखल

मुंबई | राज्याची शिखर बँक म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबईतील एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार आणि विजयसिंग मोहित-पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तब्बल २५ हजार कोटींच्या घोटळा झाल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी आज (२६ ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालायत झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांच्यावर पवारांसह मोहिते-पाटील आणि आनंदराव अडसूळ आणि शिवाजीराव नलावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

राज्याची शिखर बँक म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हजारो कोटी रुपयांची कर्जे नियमबाह्यपणे वितरित केली. राजकीय नेत्यांनी आपल्या मर्जीतील संस्था आणि व्यक्तींना नियमबाह्यपणे कर्जे दिल्याने बँक अडचणीत सापडली आणि त्यावर प्रशासक नेमणे रिझर्व्ह बँकेला भाग पडले. या संदर्भात नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग इत्यादींचे अहवाल असूनही एफआयआर नोंदवण्यात आला नाही, असा आरोप करत एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याची विनंती माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेतील शिवसेनेचे कार्यालय सील

Aprna

शरद पवार तुमच्यासारखा नेता पाकिस्तानचे कौतुक करतो ?

News Desk

“पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतर माझा मंत्रिमंडळात समावेश”, संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया

Aprna