HW News Marathi
राजकारण

मोदी-2 सरकारचा चेहरा मोदी हाच आहे !

मुंबई । मोदी यांचे मंत्रिमंडळ कसे असेल याबाबत उत्सुकता असण्याचे तसे कारण नव्हते. मोदी व शहा यांना जे हवे तेच मंत्रिमंडळात आले व जे नको ते बाहेर राहिले. मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा आता स्पष्ट झाला आहे. राजनाथ सिंह, नितीन गडकरी वगळले तर ‘दिग्गज’ किंवा ‘हेवीवेट’ म्हणावेत असे फारसे कोणी दिसत नाहीत. पण सगळ्यात महत्त्वाचे नाव आहे ते अमित शहा यांचे. भाजप विजयाचे शिल्पकार अमित शहा आहेतच. त्यामुळे ते मंत्रिमंडळात येण्याविषयी अटकळ बांधली जात होती. त्यावर आता पडदा पडला आहे. भाजपवर शहा यांचे पूर्ण नियंत्रण आलेच आहे. आता मोदी यांच्या वतीने सरकारवरही त्यांचे नियंत्रण राहील. अमित शहा हे कोणते खाते स्वीकारतात? गृह खाते की संरक्षण खाते? अरुण जेटली यांनी निवृत्ती पत्करल्यामुळे अर्थ खात्यास शहा यांचे नेतृत्व मिळतेय का हे पाहण्यासारखे आहे. त्यांनी गृह खाते स्वीकारले तर अयोध्येत राममंदिर सहज उभे राहील. शिवाय कश्मीरात 370 कलम हटविण्याची घोषणा त्यांनी केली आहे, त्या कार्यास गती मिळेल.मोदींचे सरकार त्या दिशेने गरुडझेप घेईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. मोदी-2 सरकारचा चेहरा मोदी हाच आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मोहरे काय करतात ते पाहायचे. नाहीतर अमित शहा यांचा चाबूक तेथे आहे. सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

सामनाचा आजचा अग्रलेख

 

नरेंद्र मोदी दिल्लीत पुन्हा विराजमान होत असताना देशाबरोबर जगाच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. मोदींचे सरकार त्या दिशेने गरुडझेप घेईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. मोदी-2 सरकारचा चेहरा मोदी हाच आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मोहरे काय करतात ते पाहायचे. नाहीतर अमित शहा यांचा चाबूक तेथे आहेच.

मोदी यांचे मंत्रिमंडळ कसे असेल याबाबत उत्सुकता असण्याचे तसे कारण नव्हते. मोदी व शहा यांना जे हवे तेच मंत्रिमंडळात आले व जे नको ते बाहेर राहिले. मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा आता स्पष्ट झाला आहे. राजनाथ सिंह, नितीन गडकरी वगळले तर ‘दिग्गज’ किंवा ‘हेवीवेट’ म्हणावेत असे फारसे कोणी दिसत नाहीत. पण सगळ्यात महत्त्वाचे नाव आहे ते अमित शहा यांचे. भाजप विजयाचे शिल्पकार अमित शहा आहेतच. त्यामुळे ते मंत्रिमंडळात येण्याविषयी अटकळ बांधली जात होती. त्यावर आता पडदा पडला आहे. भाजपवर शहा यांचे पूर्ण नियंत्रण आलेच आहे. आता मोदी यांच्या वतीने सरकारवरही त्यांचे नियंत्रण राहील. अमित शहा हे कोणते खाते स्वीकारतात? गृह खाते की संरक्षण खाते? अरुण जेटली यांनी निवृत्ती पत्करल्यामुळे अर्थ खात्यास शहा यांचे नेतृत्व मिळतेय का हे पाहण्यासारखे आहे. शहा यांनी संरक्षण खाते स्वीकारले तर पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल असा लोकांचा विश्वास आहे. त्यांनी गृह खाते स्वीकारले तर अयोध्येत राममंदिर सहज उभे राहील. शिवाय कश्मीरात 370 कलम हटविण्याची घोषणा त्यांनी केली आहे, त्या

कार्यास गती

मिळेल. समान नागरी कायदा लागू व्हावा अशी अमित शहा यांची इच्छा होतीच. देशभावनासुद्धा तीच असल्याने समान नागरी कायद्याबाबतचे वीर सावरकरांचे स्वप्नही साकार होईल. नक्षलवाद आणि माओवाद्यांचा हिंसाचार मोडून काढला जाईल. शहा हे अर्थमंत्री झाले तर विकासकामांना आणि आर्थिक सुधारणांना गती मिळेल. शेतकरी व कष्टकऱ्यांना लाभ मिळतील. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या प्रयत्नांना गती मिळेल. मुख्य म्हणजे ‘डॉलर’च्या तुलनेत रुपयाची घसरण रोजच सुरू आहे. त्या घसरणीस खो बसेल. शहा यांच्या येण्याने मोदी सरकारला बळ मिळेल. मोदी सरकारात आता सुषमा स्वराज नाहीत. सुरेश प्रभू दिसत नाहीत. प्रकाश जावडेकर, पियूष गोयल, रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, राव इंद्रजीत सिंह, थावरचंद गेहलोत, रामविलास पासवान, डॉक्टर हर्ष वर्धन, गिरीराज सिंह, जनरल व्ही. के. सिंह, किरण रिजिजू वगैरे जुने चेहरे आहेत. विदेश मंत्रालय स्मृती इराणी यांच्याकडे जाणार की सुषमा स्वराज यांची जागा अन्य कुणी घेणार ते पाहायला हवे. गत सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहारांवर मोदी यांचीच छाप होती व जगभरातील भ्रमणांत मोदी हे सर्व राजकीय व्यवहार पार पाडीत होते. मोदी यांच्या

मंत्रिमंडळात

अकाली दल, लोक जनशक्ती व शिवसेना प्रातिनिधिक स्वरूपात सामील झाली, पण नितीश कुमार यांच्या जनता दल (यू)ने मोदी मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही अशी भूमिका घेतली आहे. अर्थात त्यांच्या या भूमिकेवर नंतर चर्चा करता येईल, पण सध्या सर्वच राज्यांतील नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जिरवण्याचा प्रयत्न झाला आहे. खरे तर प्रयत्न म्हणण्यापेक्षा कसरतच म्हणावी लागेल. एस. जयशंकर हे परराष्ट्र खात्याचे सचिव होते व त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रातून संजय धोत्रे आले आहेत. विदर्भातून हंसराज अहिर यांचा पराभव झाला. त्यांच्या जागी धोत्रे आले. प्रकाश आंबेडकर यांचा दारुण पराभव त्यांनी पुन्हा एकदा केला. त्याची बक्षिसी त्यांना मिळाली. एका जुन्याजाणत्या कार्यकर्त्यास न्याय मिळाला असे धोत्रे यांच्या बाबतीत म्हणायला हवे. पश्चिम बंगालला चांगले प्रतिनिधित्व मिळाले. प. बंगालची पुढची लढाई जिंकण्यासाठी ही योजना आहे. या राज्याची अर्धी लढाई जिंकली आहे. उरलेले युद्ध जिंकण्यासाठी बंगालचे सरदार मोदी मंत्रिमंडळात आले आहेत. नरेंद्र मोदी दिल्लीत पुन्हा विराजमान होत असताना देशाबरोबर जगाच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. मोदींचे सरकार त्या दिशेने गरुडझेप घेईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. मोदी-2 सरकारचा चेहरा मोदी हाच आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मोहरे काय करतात ते पाहायचे. नाहीतर अमित शहा यांचा चाबूक तेथे आहेच.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रजनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीवरून विरोधकांचा राज्यसभेत गोंधळ

Aprna

‘तिहेरी तलाक’पेक्षा महिला आरक्षणाला मंजुरी द्यावी !

News Desk

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांविरोधात एकत्र यावे”, राऊतांचे संभाजीराजे-उदयनराजेंना आवाहन

Aprna