HW News Marathi
राजकारण

“पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले, तर…,” संजय राऊतांचे संकेत

मुंबई |  “पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले. तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही,” असे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरतील असा विश्वास राऊतांनी आज (28 जुलै) दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना म्हटले. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाच वेळा दिल्लीत यावे लागते.  बहुतेक ते आपला मुक्काम दिल्लीत हलवितील की काय, असे राज्यातील जनतेला वाटू लागले, असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.

शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेवर राऊत म्हणाले, “16 आमदार अपात्र ठरतील, हे नक्की किंवा त्यांना स्वत:च्या बचाव करण्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल. मग ते स्वत: शिवसैनिक कसे म्हणणार. शिंदे गटाला एका पक्षाचा आसदार घालावा लागेल. अशा वेळी यातील किती आमदार दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास तयार आहेत. यांची संपूर्ण कल्पना आमच्याकडे आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत. भविष्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले. तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही,” असे भाकीत त्यांनी वर्तवली आहे.

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेशी तसा संबंध नाही. सतत त्यांना दिल्लीला यावे लागते. यातच महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि अभिमानाला किती ढेच लागते. ते आपल्याला कळते, ते अद्याप सरकार बनवू शकले नाही,” असे म्हणत राऊतांनी शिंदेच्या दिल्ली वारीवर निशाणा साधला. राऊत पुढे म्हणाले, “शिंदे गटावर सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईची टांकती तलवार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तणावतायी वेळापत्रक आहे त्यांचा अभ्यास केला. एक तर 16 आमदारांना अपात्र ठरवले जाईल. त्याआधी शिंदे गटाच्या आमदारांना कोणत्या तरी एका पक्ष्यात स्वत:ला शिवसैनिक कसे म्हणून घेणार आहेत. ठाकरेंऱ्यांचे  सैनिक, आम्ही बाळासाहेब ठाकरे अनुयायी कसे म्हणून घेणार हा एक प्रश्न आहे.”

संबंधित बातम्या

“शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीत यावे लागले नाही,” संजय राऊतांचा टोला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेची ही घसरण आहे !

News Desk

गडचिरोलीत आज ४ मतदान केंद्रांवर फेरमतदानाला सुरुवात

News Desk

‘शिवतीर्था’वर ऐकू येणार मोदींचा आवाज; राज ठाकरेंना मुनगंटीवारांकडून स्पेशल गिफ्ट

Manasi Devkar