HW News Marathi
राजकारण

मेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय व नपुंसकतेवर आधी बोलावे !

मुंबई । विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर होणाऱ्या बोचऱ्या टिकांचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. राज्यातील विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेना महायुतीची ताकद चांगलीच वाढली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मात्र राज्यात आपल्या अस्तित्त्वाची लढाई लढण्याचे मोठे आव्हान आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज (१५ ऑक्टोबर) शिवसेनेकडून सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात युतीचे सरकार निक्रिय आहे असे गांधी म्हणतात . मग आपण स्वतः किती क्रियाशील आहात याचाही हिशेब द्या. मेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय व नपुंसकतेवर आधी बोलावे . सरकार निक्रिय ठरले असेल तर त्याचा निर्णय जनताजनार्दन घेईल”, असे सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आले आहे.

काय आहे आजचे सामनाचे संपादकीय ?

ज्या मुद्द्यांना मुख्यमंत्री फडणवीस वगैरे मंडळी प्रचारात हात लावीत नाहीत त्या मुद्द्यांना उचलू नये अशी बंधने कोणी विरोधी पक्षांवर घातलेली नाहीत , पण काँग्रेस पक्षाचा सेनापतीच युद्धभूमीवरून पळ काढतो व बँकॉकला जाऊन बसतो . त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता रणात आणि मनात अशा दोन्ही ठिकाणी पराभूत होताना दिसत आहे . महाराष्ट्रात युतीचे सरकार निक्रिय आहे असे गांधी म्हणतात . मग आपण स्वतः किती क्रियाशील आहात याचाही हिशेब द्या. मेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय व नपुंसकतेवर आधी बोलावे . सरकार निक्रिय ठरले असेल तर त्याचा निर्णय जनताजनार्दन घेईल .

महाराष्ट्राचे सरकार निक्रिय असल्याची टीका राहुल गांधी यांनी मुंबईत येऊन केली. राहुल गांधी यांच्या टीकेला घणाघात वगैरे म्हणता येणार नाही. राहुल आले व त्यांनी मुंबईतील रस्त्यांवर सभा घेतली. लोकसभा निवडणुकांपासून गायब झालेले राहुल गांधी अखेर प्रकट झाले. मधल्या काळात ते बँकॉक-पटाया भागात गेले व तेथे अदृश्य झाले. बँकॉक ही जागा काही प्रतिष्ठत राजकीय नेत्यांनी जाऊन आराम करण्याची नाही. त्यामुळे गांधी बँकॉकला नक्की कशासाठी गेले? यावर संपूर्ण देशातले वातावरण ढवळून निघाले. महाराष्ट्र आणि हरयाणातील काँग्रेस पक्ष एकाकी झुंज देत असताना त्यांचा नेता बँकॉकमध्ये आराम फर्मावत होता. त्याची बोंब होताच राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या प्रचारात अवतरले. राहुल गांधी यांच्याविषयीचा संभ्रम त्यामुळे कमी झाला. राहुल गांधींचे आता असे म्हणणे आहे की, हे सरकार निक्रिय आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. जनता कर भरते मग तो कर कुठे जातो? याचे उत्तर सरकार देत नाही असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे. सरकार निक्रिय आणि कुचकामी असेल तर विधानसभा निवडणुकीत जनता त्यांचा समाचार घेईल. प्रश्न इतकाच आहे की, संपूर्ण काँग्रेस पक्ष मेलेल्या अजगरासारखा

निपचित आणि निक्रिय

पडून असताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारला निक्रिय ठरवले त्याचे आश्चर्य वाटते. लोकसभा निवडणूक निकालाच्या धक्क्यातून राहुल गांधी सावरले नाहीत व त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून काँग्रेस हा बिन मुंडक्याचा पक्ष म्हणून वावरत आहे. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सोडून राहुल गांधी बँकॉक, युरोप वाऱ्या करतात व दुसऱ्यांना निक्रिय म्हणतात. काँग्रेसला गेल्या चार महिन्यांत अध्यक्ष निवडता आला नाही याचे कारण आधी सांगा. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस महाराष्ट्रात इतका निक्रिय ठरला की, विरोधी पक्ष नेताच फौजफाटय़ासह भाजपात विलीन झाला. वरचे नेतृत्व निक्रिय असल्याचा हा परिणाम आहे. महाराष्ट्रात प्रश्न नक्कीच आहेत. काही प्रश्न अचानक निर्माण होतात. अशावेळी जनतेचा आवाज बुलंद करणारा विरोधी पक्ष सक्रिय असावा लागतो. तो विरोधी पक्ष गेल्या पाच वर्षांत दिसलाच नाही व अशा निक्रिय आणि बेदखल विरोधकांचे नेते राज्य सरकारला निक्रिय ठरवून मोकळे होतात यास काय म्हणावे? बेरोजगारी, पीएमसी बँक घोटाळा यावर मुख्यमंत्री फडणवीस, अमित शहा काहीच बोलत नाहीत

असा आरोप

राहुल गांधी करतात. भाजप व इतर नेते महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी इतर मुद्दे पुढे करून दिशाभूल करतात असे गांधी म्हणत असतील तर ते विरोधी पक्षांच्या निक्रियतेचे पाप आहे. महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कोणते? मुळात या सर्व मुद्द्यांशी सध्या राहुल गांधींचा संबंध राहिला आहे काय? म्हणजे विरोधी पक्षांच्या बोंबलण्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. एक वेळ राज्यकर्त्यांवरचा विश्वास उडाला तर चालेल, पण लोकशाहीत विरोधी पक्षावरचा विश्वास उडता कामा नये ही भावना आहे. ज्या मुद्द्यांना मुख्यमंत्री फडणवीस वगैरे मंडळी प्रचारात हात लावीत नाहीत त्या मुद्द्यांना उचलू नये अशी बंधने कोणी विरोधी पक्षांवर घातलेली नाहीत, पण काँग्रेस पक्षाचा सेनापतीच युद्धभूमीवरून पळ काढतो व बँकॉकला जाऊन बसतो. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता रणात आणि मनात अशा दोन्ही ठिकाणी पराभूत होताना दिसत आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार निक्रिय आहे असे गांधी म्हणतात. मग आपण स्वतः किती क्रियाशील आहात याचाही हिशेब द्या. मेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय व नपुंसकतेवर आधी बोलावे. सरकार निक्रिय ठरले असेल तर त्याचा निर्णय जनताजनार्दन घेईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला सेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे, राज्य उभारायचे आहे | उद्धव ठाकरे

Gauri Tilekar

सत्ता नको, मला विरोधी पक्ष व्हायचंय !

Gauri Tilekar

#LokSabhaElections2019 : …तर मग मोदींनी सर्वच ४२ मतदारसंघातून निवडणूक लढवावी !

News Desk