HW News Marathi
राजकारण

धक्कादायक… उस्मानाबादमध्ये मतदान करताना राष्ट्रवादीचे फेसबुक लाईव्ह

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आज (१८ एप्रिल) रोजी महाराष्ट्रात १० लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. मतदान केंद्रमध्ये मोबाईल नेण्यास आणि चित्रिकरण करण्यास बंदी असतानाही अति उत्साही उमेदवार फोटो आणि व्हिडिओ काढत आहेत.

असाचा धक्कादायक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला आहे. राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेच्या प्रणव पाटीलचे मतदान करताना फेसबुक लाईव्ह करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले. तर परभणी मतदारसंघात मतदारांनी कोणाला मतदान केले याचे पुरावेच त्या पक्षांच्या उमेदवारांना पाठविल्याने निवडणूक कर्मचारीही हैराण झाले आहेत.

मतदान कोणाला करावे हे प्रत्येकाचे मतदाराची आवड असेत. परंतु तुम्ही दिलेले मतदान कोणाला कळून नये आणि कोणाताही धोका निर्माण होऊ नये. यासाठी निवडणूक आयोगाने बंद खोलीमध्ये बॉक्स करून मतदान यंत्रा ठेवण्यात आली आहे. यात ठिकाणी मोबाईल नेत्यास मनाई केली असताना देखील असा प्रकार घडणे धोक्कादायक असल्याचे म्हटले जाते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील ६ उमेदवारांचा समावेश

News Desk

“गद्दार त्यांचं काय चाटत आहेत माहिती नाही”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका

Aprna

नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला !

News Desk