HW News Marathi
राजकारण

सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांकडून मागवले स्पष्टीकरण

नवी दिल्ली | सीबीआयमधील अंतर्गत वादावर सीव्हीसीने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात विवादावर महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी सक्कीतीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी सीव्हीसीच्या अहवालाची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाने वर्मा यांना अहवालावर सोमवारपर्यंत आपले स्पष्टीकरण सादर करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. परंतु राकेश अस्थाना यांच्या वकिलांनी सीव्हीसीच्या अहवालाची प्रत देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० नोव्हेंबरला होणार आहे.

केंद्रीय दक्षता आयोगाचा अहवाल बंद लिफाफ्यात आलोक वर्मा यांना देण्यात येणार आहे. त्यावर ते आपले उत्तर दाखल करु शकतात. त्याच्या आधारे न्यायालय निर्णय घेईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय विशेष संचालक राकेश अस्थाना यांना चौकशी अहवाल देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालय २० नोव्हेंबरला पुढील सुनावणी घेणार आहे. ‘हा रिपोर्ट तुम्हाला बंद लिफाफ्यात देऊ शकतो आणि तुम्ही बंद लिफाफ्यात त्याचे उत्तर देऊ शकता’, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. उत्तरासाठी आलोक वर्मा यांना सोमवारपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

सीबीआयच्या अधिकाऱ्यांविरुध्द असलेल्या आरोपांची तपासणी करीत असतांना सीवीसीने सीबीआय प्रमुख आणि राकेश अस्थाना या दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी एकमेकांवर लाच घेतल्याचा आरोप लावला होता. काही व्यासायिकांकडून लाच घेतली असल्याचा आरोप आलोक वर्माने अस्थानावर लावला होता. आलोक वर्माने अस्थानाच्या विरोधात भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप लावत चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सीबीआयमध्ये सुरू असलेला गोंधळ चव्हाट्यावर आला. वाद अधिक वाढत असल्याच पाहून सरकारने दोन्ही वरीष्ट अधीकाऱ्यांना सुट्टीवर पाठवले.

सरकारचे स्पष्टिकरण

सीबीआयमध्ये सुरू असलेल्या गोंधळावर वित्तमंत्री अरूण जेटली यांनी मोठ विधान केले आहे. या प्रकरणातून हात झटकत सरकारमधील मंत्र्यांनी विपक्षकडून केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहे. या प्रकरणाचा तपास सीवीसी करणार असल्याच त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सीवीसीच्या निर्देशानुसारच आदेश दिले आहे. विपक्षच कामच आहे आरोप लावणे. ते सर्व बिनबुडाचे आरोप आहेत. असेही ते म्हणाले. सीबीआय मध्ये नेमके सुरू आहे हे तरी विपक्षला माहीत आहे का असा प्रश्नही त्यांना विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे काँग्रेसकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता

Aprna

राहुल यांची भेट म्हणजे राजकीय खेळी, पर्रीकरांनी सुनावले

News Desk

आरएसएस आणि भाजपची विचारसरणीही हिटलरच्या नाझीवादाशी प्रेरित !

News Desk