नवी दिल्ली। पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशी यांनी करतारपूर कॉरिडोर भूमिपूजन समारंभासाठी भारत सरकारला निमंत्रीत करणे ही पंतप्रधान इम्रान खान यांनी टाकलेली गुगली होती. या गुगलीमुळे मोदी सरकार क्लीनबोल्ड झाल्याचे कुरेशी यांनी म्हटले होते. कारण, सुषमा स्वराज यांनी व्यस्त असल्याने या कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. त्यामुळे भारताला देण्यात आलेले निमंत्रण ही गुगली होती, असे कुरेशी यांनी म्हटले होते.
Mr.Foreign Minister of Pakistan – Your ‘googly’ remarks in a dramatic manner has exposed none but YOU. This shows that you have no respect for Sikh sentiments. You only play ‘googlies’. /1
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) December 1, 2018
Let me explain to you that we were not trapped by your ‘googlies’. Our two Sikh Ministers went to Kartarpur Sahib to offer prayers in the Holy Gurudwara. /2
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) December 1, 2018
यावर उत्तर देताना भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी असे म्हटले की, कुरेशी यांच्या टीकेमुळे त्यांचा खरा चेहरा जगासमोर आला असून पाकिस्तानच्या मनात शीख बांधवांप्रती कुठलीही प्रेमभावना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच भारत सरकारने आपल्या दोन शीख मंत्र्यांना करतारपूर येथील पवित्र गुरुद्वाराच्या दर्शनासाठी पाठवले होते. त्यामुळे तुमच्या गुगलीत आम्ही अजिबात फसलो नाही, असेही स्वराज यांनी म्हटले आहे. दरम्यान, कुरेशी यांच्या या वक्तव्याच्या एक दिवस अगोदरच सुषमा स्वराज यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post