HW News Marathi
राजकारण

आता आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा खटाटोप

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश या ३ मोठ्या राज्यांत पराभवाच्या पार्श्वभूमीवर जनतेला पुन्हा एकदा स्वतःच्या बाजूने वळविण्यासाठी भाजपकडून शेतकऱ्यांना तब्बल ४ लाख कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कर्जमाफीचा २ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील शेतकरी कर्जमाफीची घोषणा करूनच भाजपने यश मिळवले होते.

भाजप सरकारपुढे आता २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान आहे. तीन मोठ्या राज्यांमध्ये झालेल्या दणदणीत पराभवानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता भाजपकडून कोणत्याही मार्गांचा अवलंब करून पुन्हा लोकांची मने जिंकण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. तीन राज्यांमधील पराभव हा शेतकरी बांधवांच्या नाराजीमुळे झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने भाजपकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

Manasi Devkar

मोदींना स्किझोफ्रेनिया झालाय का ?, राहुल गांधींचा सवाल

News Desk

“पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले, तर…,” संजय राऊतांचे संकेत

Aprna
देश / विदेश

काश्मीरमधील सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

श्रीनगर | जम्मू काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमधील चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुरुवारी (१३ डिसेंबर) सकाळच्या सुमारास या दहशतवाद्यांचा कंठस्नान घालण्यात आले आहे. सध्या या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

ब्राथ कला परिसरात बुधवारी (१२ डिसेंबर) सायंकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. भारतीय लष्कर, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम राबवली.

परिसरातील एका घरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. जवान घटनास्थळी पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. परंतु रात्री जवानांनी मोहीम थांबवली आणि आज सकाळी पुन्हा सुरू झालेल्या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.

तसेच काश्मीर खोऱ्यात जवानांकडून वारंवार दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली जात आहे. या वर्षात आतापर्यंत २३५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक दहशतवाद्यांची संख्या अधिक होती.

Related posts

भारतीय लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांची नियुक्ती  

News Desk

कर्नाटक निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात….

News Desk