HW News Marathi
राजकारण

अजित पवार नाराजीच्या बातम्यांवर म्हणाले…

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे तब्बल आठ दिवसांनी माध्यमांसमोर आले आहेत. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी येथे शिबीर पार पडले. या शिबीर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते. यानंतर गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांनी सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नव्हते. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अजित पवार नाराज असल्याचा चर्चा रंगू लागल्या होत्या. यानंतर अजित पवार हे आज ( 11 नोव्हेंबर) पुण्यातील मावळ येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर अजित पवारांनी नाराजीच्या सर्व बातम्यांना पूर्णविराम दिलेला आहे.

 

यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना नाराजीसंदर्भात प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “मी बाहेर गावी गेलेलो होतो. 4 तारखेला माझी फ्लाईट होते. मी रात्री उशीरा गेलो, आणि दहाला रात्री आलो. काही माहिती घ्याची नाही, काही नाही. वेगवेगळ्या चॅनेलवर कल्पी चालू ठेवायच्या कोणी तरी माझ्या ऑफिसला विचारायचे होते. की, अजित पवार कुठे गेलेले आहेत. जो माणूस परदेशात जातो. तो माणूस लगेचच परेदशातून लगेच परत येऊ शकत नाही. मला त्यासंदर्भाक काही बोलायचे मी त्याची वेगळी पत्रकार परिषद घेईन. मधल्या काळात कारण नसताना माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि जनमानसात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला. मी असा कधीही पळून जाणारा माणूस नाही. मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूनस आहे. हे बऱ्याच जणांना माहिती आहे.”

 

भारत जोडो यात्रेसंदर्भात अजित पवार म्हणाले

राज्यात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद दिसत आहे. यातून बद्दलाचे चित्र दिसत आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “या यात्रेला सुरुवातपासूनच प्रतिसादत मिळत होता. हा प्रतिसाद भारत जोडो यात्रा संपल्यावर पण, जे वातावरण होते. शेवटी ते वातावरण कसे,  म्हणजे एखादे वातावरण बदलले तर ते वातावरणात भर टाकण्याचे काम करायचे असते. हे बदललेले वातावरण टिकवून ठेवायचे असते. नाही तर बऱ्याचदा काय होते. चांगल्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी होतात. आणि दोन महिन्यांनी पुन्हा लोक हळूहळू विसरुन जातात, असे होऊन देता कामा नये. ज्या महत्वाच्या समस्या आहेत. त्यांना अक्रम देणे आणि जे कोणी राज्यकर्ते काम करत असतील. त्यांच्यासंदर्भातील ज्या काही समाजाच्या हिताच्या गोष्टी होताना दिसत नाहीत. ते लोकांच्या समोर आणूण सातत्याने ठेवणे. हे काम आम्ही विरोधी पक्ष म्हणून केले पाहिजे.”

राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही

राज्यात ओला दुष्काळसंदर्भात पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “ओला दुष्काळ माझ्या मते हे सरकार, कारण मी माझ्या मते दिवाळी अधी दिवाळीच्या आधी त्यांना भेटलो होतो. तेव्हा मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ओला दुष्काळ जाहीर करा, अशी माहिती केल्याची त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले. पुढे अजित पवार म्हणाले, “दिवाळीच्या काळात थोडे समाधान शेतकरी वर्गाला होईल. परंतु, दोघांनी ते केले नाही. आणि आताची परिस्थिती बघता, मागे तुम्हाला आठवत असेल की, अधिवेशनाच्या काळात ओला दुष्काळ जाहीर करा, असे हरिपाच्याबद्दल आता तर रब्बीचे पीक आहे. म्हणजे आता आपले खरिपा आणि रब्बीचे नुकसान झाले. आज विम्याचे पण पैसे मिळत नाही येत. विम्याची ऐवढी रक्कम ऐकायला मिळते. परंतु, विमा कंपन्या तुटपूजी रक्कम देतात. या सगळ्यांकडे सरकार म्हणून आताच्या राज्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे. ही आमची मागणी आहे.”

 

 

 

Related posts

“आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही”, नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Aprna

INX Media Case : माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात

News Desk

मी जिथे आहे तिथे खूश आहे !

News Desk