HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर शरद पवार यांची पत्रकार परिषद; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. “आज जे काही झाले, उद्याच्या 24 तासात किंवा 48 तासात पूर्ण संपले नाही. तर माझ्यासह सगळ्याना बेळगावच्या लोकांना धीर देण्यासाठी जावे लागेल”, असा इशारा  शरद पवार यांनी मंगळवारी (6 डिसेंबर) रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला होता. बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने तोडफोडी होती. या प्रकरणाने राज्यात राजकीय वातावरण तापले होते. शरद पवार आज (8 डिसेंबर) दुपारी 1 वाजता होणार पत्रकार परिषदेत काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणी शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, “महाराष्ट्र एककीकरण समिती यांच्या लोकांच्या होणाऱ्या यातना. या सर्व गोष्टीत राज्य सरकार काय करतय हे बघून चालणार नाही. आज जे काही झाले, उद्याच्या 24 तासात किंवा 48 तासात पूर्ण संपले नाही. तर माझ्यासह सगळ्याना बेळगावच्या लोकांना धीर देण्यासाठी जावे लागेल.” कर्नाटक सरकारकडून कोणीही आमच्याकडे येऊ नये, चर्चा करून असे सांगितले जाते. आणि राज्य सरकार भूमिका का घेत नाही, केंद्र सरकारचा दवाब आहे का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारल्यावर ते म्हणाले, “केंद्राचा दबाव काय दोन्ही राज्यात त्यांची सरकार आहे. प्रश्न तो नाही. पण, आपण आजूनही संयम दाखवित होतो. जर हे असेच चालू राहिले. तर काय होईल हे काही सांगता येणार नाही.”

नेमके काय घडले 

पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या गाड्यांवर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने हल्ला केला आहे. या संघटनेने बेळगावच्या (Belgaum) हिरेबागेवाडी टोल नाक्यावर हल्ला केला आहे. या संघटने जवळपास 6 गाड्यांपेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली होती. या संघटनेचे नारायण गौडा हे 6 डिसेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान गौडांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रस्ता रोको करत आंदोलन केले होते. तसेच बेळगावच्या हिरबागेवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेंनी तोडफोड केल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती. आणि पोलिसांनी नारायण गौडांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. कन्नड संघनटांनेच्या कार्यकर्त्यांनी वाहनांवर दगडफेक करत लाल पिवळे झेंडे फडकून महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविरोधात करत आंदोलन केले होते. या संघटनांकडून शहरात अजून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होते.

संबंधित बातम्या

“48 तासात प्रकरण पूर्ण संपले नाही तर…”, शरद पवारांचा इशारा

 

Related posts

शिवतीर्थावर आज होणार मनसे ‘राज’गर्जना

News Desk

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला भव्य मोर्चा

Aprna

शिंदे गटाला घटनापीठाचा मोठा दिलासा! पक्षचिन्हाबद्दलचा निर्णय निवडणूक आयोग घेणार

Aprna