HW News Marathi
राजकारण

ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

मुंबई | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) ऋतुजा लटकेंना (Rituja Latke) उमेदवारी दिली आहे. ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. ऋतुजा लटकेंनी निवडणूक लढवणार असल्याने त्यांनी त्यांच्या मुंबई महापालिकेच्या लिपिक पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु, महापालिकेने अद्यापही त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात दरवाजा ठोठावला आहे. या प्रकरणावर न्यायालयात आज (13 ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. यावर न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऋतुजा लटकेंनी महिना भरापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, मुंबई महापालिकेने राजीनामा मंजूर केला नाही. “ऋतुजा रमेश लटकेंना (Rituja Ramesh Latke) शिंदे गटाकडून लढण्यासाठी दबाव टाकला जात आहे”, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी बुधवारी (12 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत शिंदे गटा आणि ऋतुजा रमेश लटकेंच्या राजीनामावर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांवर दबाव असल्याचे देखील पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लटके कुटुंबियांसोबत दुबईला फिरण्याठी गेले होते. लटके यांना 11 मे रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. लटके २ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. लटकेंच्या निधनाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाल्याने तेथे पोटनिवडणूक लागली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाची ही पहिली निवडणूक असून या निवडणुकीत दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

संबंधित बातम्या

“आमची निष्ठा उद्धवसाहेबांसोबतच”, शिंदे गटाच्या दबावाच्या चर्चांवर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर; ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाआघाडीचा तिढा अखेर सुटला, काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागांवर निवडणुका लढविणार

News Desk

राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही, सोडू देणार नाही !

News Desk

#LokSabhaElections2019 : आता भाजपचे सर्वच नेते झाले ‘चौकीदार’, भाजपचे नवे प्रचारतंत्र

News Desk