HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांना मराठीचा विसर पडला आहे काय ?

शिर्डी | श्री साई बाबा मंदिराच्या समाधी शताब्दी उत्सवात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध कामांचे भूमीपूजन देखील करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निवासाची चाव्या देण्यात आल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात हिंदी भाषेतून केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणा दरम्यान हिंदीतून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आहे. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मात्र मराठीचा विसर पडला काय? असा सवाल उपस्थितांच्या मनात नक्की आला असेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत महाराष्ट्रातील जनतेशी मराठीत संवाद साधला. परंतु राज्याचे मुख्यमंत्रीच महाराष्ट्रातील जनतेशी हिंदीत संवाद साधतात. या कारणास्तव मुख्यमंत्र्यी टीकेचे धनी झाले आहेत.

मोदी मराठी नेमके काय बोले

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘पंतप्रधान आवास योजने’ अंतर्गत महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांना घरे मिळाली त्यांची मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला आहे. यात महाराष्ट्रतील नंदुरबार जिल्हातील ११ हजार ४७६ घरेही पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरे बांधण्यात आली आहे.

त्यापैकी एका व्यक्तीशी मोदींनी मराठी संवाद साधले. मोदी त्यांच्याशी बोलताना मराठी म्हणाले की, “आता तुम्ही प्रसंन्न आहेत का, कस काय, काय आज मिठाई केली की नाही, माझ्यासाठी मिठाई पाठवणार का? घर कस आहेत, चांगले आहे, मुले काय करतात, मुली आहेत का? मुली शाळेत जाती का? तुला तुम्हा बरे वाटले का?,” असे मराठी संवाद साधून त्यांना प्रश्न विचारले. मोदींनी अगदी अपुलकीने महाराष्ट्रातील जनतेशी विचारपूस केली. तसेच नागपुरमधील महिलांशी म्हणाले की, सगळ्यांना “नमस्कार, घरगृहप्रवेश केला का?, पुजा केली का, विषेश विजयदशमी झाली तुमची, विजयदशमीला तुम्ही दसरा बोलताना, हा दसरा तुमच्यासाठी विशेष झाला ना” देखील मराठीतून संवाद साधला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेबांनी माझ्यावर उद्धवपेक्षा जास्त प्रेम केले !  

News Desk

निलंबनानंतर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

गुजरात विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये बंडखोरी

Darrell Miranda