HW News Marathi
महाराष्ट्र

मोदींचे २०२२ चे स्वप्न आम्ही २०१९ मध्येच पूर्ण करू !

शिर्डी । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यपाल सी.विद्या सागर राव उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी अनेक विविध विकासाच्या कामाचा शुभारंभ करण्यात केला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी आवास योजने अंतर्गत २ लाख ४४ हजार लोकांना घर वाटप करण्यात आले आहे. ‘मोदींचे २०२२ चे स्वप्न आम्ही २०१९ मध्येच पूर्ण करू’,असे आश्वसन फडणवीस यांनी मोदींना दिले आहे.

शिर्डीमध्ये लाखो भक्त दाखल होतात ,त्यांना ताटकळत थांबावे लागते म्हणून त्यांच्या सोयीसाठी ‘दर्शनबारी’ तयार करण्यात आली आहे. शिर्डीमध्ये नॉलेज सिटी, उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकुल स्थापन करणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी सांगितले . ज्या वेळी भारताला ७५ वर्षे पूर्ण होतील त्यावेळी एकही माणूस बेघर राहणार नाही. प्रत्येकाला स्वतःच घर मिळेल असे वचन मोदींनी दिले होते. ‘घर देण्याचे जे वचन दिले गेले होते, ते मोदींनी पूर्ण केले आहे’,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आज महाराष्ट्रमध्ये अडीच लाख लोकांचा गृहप्रवेश आज करण्यात येणार आहेत. ‘साडेचार लाख घरचे काम आम्ही डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार आहोत’, असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला काँग्रेस टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला टोला लगावला आहे की, ‘गरिबी हटाओ का नारा’ सगळ्यांनीच दिला. परंतु गरिबांसाठी ज्यांनी काम केले ते फक्त नरेंद्र मोदी आहेत.’ पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कामे सुरु आहेत. स्वछ भारत अभियाना अंतर्गत ३ वर्षात ७ लाख शौचालय बांधून आम्ही महाराष्ट्राला हागणदारी मुक्त करण्यात यश आले आहे,’ असे ही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोनाच्या चाचणी अहवालात पॉझिटिव्ह रिपोर्ट आले निगेटिव्ह…

News Desk

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही तर पक्षप्रमुख म्हणून बोलत होते प्रशांत ठाकूरांचा आरोप…

News Desk

आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू, राऊतांचा भाजपला इशारा

News Desk
मुंबई

आता खाजगी विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान 

Gauri Tilekar

मुंबई | मुंबईतील खाजगी विनाअनुदानित शाळांना पालिका आणि राज्य सरकार यांच्याकडून प्रत्येकी ५० टक्‍के अनुदान दिले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारकडून ५० टक्के अनुदान पालिकेला मिळालेले नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण हे बंधनकारक कर्तव्य समजून या शाळांना १०० टक्के अनुदान देण्याच्या प्रस्तावाला पालिकेच्या सभागृहाची मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे आता या शाळांना लवकरच १०० टक्के अनुदान मिळणार आहे.

शासनाकडून या शाळांना मिळणारे ५० टक्के अनुदान गेल्या २००४ पासून बंद झाले आहे. मात्र महानगरपालिका या शाळांना नियमित अनुदान देत आहे. सरकारने अनुदान देणे बंद केल्याने खासगी विनाअनुदानित शाळातील व्यवस्थापनाला शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वेतन देणे अवघड झाले आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी केवळ विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून काम करीत आहेत. मात्र या शाळांना मोठ्या आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या शाळांच्या समस्यांचा विचार करून शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी या शाळांना पालिकेने १०० टक्के अनुदान देण्याची मागणी केली होती. त्याबाबतच्या मागणीच्या प्रस्तावाला पालिका सभागृहाची मंजूरी मिळाली आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या शाळांची दखल घेऊन शाळांना १०० टक्के अनुदान देण्यास संमती दर्शविली आहे.

Related posts

बीड जिल्ह्यासह राज्यातील रूग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा | धनंजय मुंडे

News Desk

धक्कादायक…मानखुर्दमध्ये ४ वर्षाच्या मुलीला मारहाण

News Desk

येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला

News Desk