चेन्नई | दक्षिण सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यात आता अजून एका वादाची भर पडली आहे. “सरकार काश्मीरमध्ये जनमत घेण्यासाठी का घाबरत आहे,” असा एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या मुलाखतीत हासन यांनी केला.पुढे हासन यांनी असे देखील म्हटले आहे की, “सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुलाखतीमध्ये पाकव्याप्त काश्मीरला ‘स्वतंत्र काश्मीर’ म्हटले आहे. काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्यात यावी.” हासन यांच्या या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.
Makkal Needhi Maiam leader Kamal Hassan at an event in Chennai yesterday: Why India is not holding a plebiscite in Kashmir? What are they (Indian government) afraid of? pic.twitter.com/9M6bS5JoWV
— ANI (@ANI) February 18, 2019
तसेच जनमत घेतल्यास काश्मीरी नागरिक भारतासोबत राहण्याची इच्छित असतील, त्यांची पाकिस्तान जाणे किंवा स्वतंत्र काश्मीर हवा आहे, ते तरी कळेल. जनमत घेण्याचा मुद्दा अनेक संघटनांनी आधी देखील उपस्थित केला होता. भारत स्वत:ला एक चांगला देश म्हणवत असेल तर अशा प्रकारची वागणूक देता कामा नये, असेही देखील हासन यांनी म्हटले आहे.
हासन यांना पुलवामामध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या दशतवादी हल्ल्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. चेन्नईमध्ये आयोजित एका सभेमध्ये हासन यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये जवान मरण्यासाठी येतात असे कोणी म्हटले की, आपल्याला वेदना होतात. भारतीय सेनाही जुन्या फॅशनसारखी झालीय. ज्याप्रकारे जग बदलत आहे, आपण कसे ठरवू शकतो की माणूस खाण्यासाठी दुसऱ्या माणसाला मारू शकत नाही. युद्ध आणि वाद संपवण्याचीही एक वेळ येईल. मानवतेने गेल्या १० वर्षात काही शिकवले नाही का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.