नवी दिल्ली | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (२५ जानेवारी) प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला देशातील जनतेला संबोधित केले आहे. भारताची भौगोलिक आणि सामाजिक विविधता व विशालता लक्षात घेता देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अपरिहार्य आहे, असे राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणातून सांगितले आहे.
President Ram Nath Kovind:This Independence Day is important for us in a special way. On Oct 2, we'll celebrate 150th birth anniversary of Mahatma Gandhi. Not only for India, but this anniversary is also an opportunity for entire world to understand,adopt&implement his principles
— ANI (@ANI) January 25, 2019
येत्या २ ऑक्टोबरला आपण महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होणार असून, ही जयंती फक्त देशासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी खास असणार आहे. तसेच गांधींचे धोरणे आत्मसात करून अंमलबजावणी करण्यासाठी संधी असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. २१ व्या शतकात जन्मलेल्या मतदारांना पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संधी मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आपण सर्वांना १७व्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावा लागेल असे ते म्हणाले. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात देशातील मुलींचा खास उल्लेख केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.