HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसकडून ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई | काँग्रेसने भाजपच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या चुकाच्या कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’या पुस्तिकेचे प्रकाशन काल (३० मार्च) केले आहे. याबरोबरच लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसच्या कंट्रोल रूमचे उद्घाटन काल मुंबईच्या टिळक भवन येथे करण्यात आले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये काल प्रवेश केला. गायकवाड यांना काँग्रेसच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. गायकवाड त्यांच्या समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.

रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याने पुण्याची जागा राष्ट्रवादीला येईल, अशी चर्चा काल (२९ मार्च) पुण्यात रंगली होती.  तसेच झाल्यास राष्ट्रवादीकडून प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या पुस्तिकाच्या प्रकाशन वेळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, निरीक्षक मधुसुदन मिस्त्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, आदी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

 

Related posts

उदयनराजे यांची भाजपमध्ये वापसी ? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Gauri Tilekar

कश्मीरात जो हिंसाचार, दहशतवाद आणि फुटीरतावाद बोकाळला आहे त्यास एकटा सिद्धू जबाबदार नाही | ठाकरे

News Desk

२ पेक्षा अधिक मुले झाल्यास मिळणार इन्सेंटिव्ह !

News Desk