HW News Marathi
राजकारण

संजय राऊतांचा जामीन स्थगित करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीनाला स्थगिती देण्यात यावी. ईडीची ही मागणी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने राऊतांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam) आज (9 नोव्हेंबर) जामीन मंजूर झाला आहे. राऊतांच्या जामीनाविरोधात ईडीने न्यायालयाकडे स्थगिती देण्याची मागणी केली होती. यानंतर न्यायालयाने पुन्हा दुपारी ईडीच्या मागणीवर सुनावणी पार पडली. यावेळी राऊतांच्या जामीनाच्या मागणीला स्थगिती देण्याची  ईडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. यानंतर आता राऊतांचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.  राऊतांचा जामीन मंजूर झाल्यानंतर गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत आहेत. राऊतांसह प्रवीण राऊत यांना देखील जामीन मंजूर झाला आहे.

न्यायालयाने राऊतांना तब्बल 100 दिवसांनंतर जामीन मंजूर केला आहे. राऊतांच्या जामीन अर्जावर ईडी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाची वेळ ही 4.30 वाजेपर्यंतची आहे. परंतु, राऊतांच्या जामीन अर्जाविरोधाची ईडीची याचिका उच्च न्यायालयात घेणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यायालयाने राऊतांना 2 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. विशेष पीएमएलए न्यायालयात राऊतांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ईडी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी ईडीने राऊतांच्या जामीन स्थगितीसाठी आजच्या सुनावणीदरम्यान जोरदार युक्तीवाद केला होता. यापूर्वी राऊतांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली. यानंतर न्यायालयाने आजच्या सुनावणीत लेखी स्वरुपात उत्तर राखून ठेवला होता. यावर आज सुनावणीदरम्यान न्यायधीश एम. जी देशपांडेंनी ऑर्डरची कॉपी वाचली आणि त्यावर सही केली आणि त्यानंतर न्यायाधीशांनी प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांना जामीन मंजूर केल्याचे सांगितले.

न्यायालयात युक्तीवाददरम्यान नेमके काय झाले

एएसजी अनिल सिंग हे न्यायालयात ईडीचे वकील जे राऊतांविरोधात युक्तीवाद करत आहेत. अनिल सिंग यांनी न्यायालयासमोर विनंत केली की, “राऊतांच्या जामीन अर्जावर स्थगिती आणण्यासाठी त्यांचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य करावा. जेणे करून ईडीला राऊतांच्या जामीन अर्जाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आम्हाला म्हणजे ईडीला संधी मिळायलाच हवी, अशी मागणी त्यांनी केली. कारण हे छोटे मोठे प्रकरण नसून यात मोठी नावे सहभाग आहे. या आठवड्यात न्यायालयाचे केवळ दोन कामकाजाचे दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर आठवड्याभराची स्थगिती द्यावी, ज्यामुळे ईडी निकालाचा अभ्यास करून पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात दाद मागू शकेल, अशा युक्तीवाद ईडीचे वकील सिंग यांनी केला.”

नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

 

 

 

 

Related posts

मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘या’ पाहुण्यांना आहे निमंत्रण

News Desk

इतक्या वर्षांनंतर मोदी यांच्या तोंडून राममंदिराचा उच्चार तरी झाला!

News Desk

…म्हणून मी पंतप्रधान मोदींविरुद्ध वाराणसीतून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला !

News Desk