May 24, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

…तर पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद दिसणार नाही !

नवी दिल्ली | “इम्रान खान यांचे जर खरंच पंतप्रधान मोदींवर प्रेम असेल तर पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद दिसणार नाही. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना थारा दिला जाणार नाही. पाकिस्तानमधून दहशतवाद संपूर्णपणे नष्ट होईल”, असे विधान केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे कायमच पंतप्रधान मोदींच्या बाजूने भूमिका घेत असतात. त्यामुळे विरोधकांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जातात. याच पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह बोलत होते.

“काँग्रेसने आमच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला कमकुवत करत आहे. आपल्या जवानांच्या शौर्याची, धैर्याची प्रशंसा करणे चुकीचे आहे का ? आम्ही केवळ निवडणुकांच्या वेळीच नव्हे तर कायमच आपल्या जवानांच्या शौर्याचे पराक्रमाचे कौतुक करतो. भाजपने कधीच कोणाच्या देशभक्तीवर संशय घेतला नाही”, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

“दहशतवादाला जात, धर्म, प्रांत असे काहीही नसते. दहशतवाद हा दहशतवादच असतो. आम्ही जागतिक पातळीवर सर्व देशांना एकत्र करून दहशतवादाच्या समस्येचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहोत. इम्रान खान यांचे जर खरंच पंतप्रधान मोदींवर प्रेम असेल तर पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद दिसणार नाही. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना थारा दिला जाणार नाही”, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

Related posts

राज्यातील जनतेची निराशा करणारे अधिवेशन-धनंजय मुंडे

Ramdas Pandewad

हल्लाबोलच्या प्रतिसादानंतर राष्ट्रवादीची राज्यभर परिवर्तन यात्रा !

News Desk

देशभरात १३ राज्यांत ९७ जागांसाठी आज होणार मतदान

News Desk