HW News Marathi
राजकारण

…मग शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन का नाही ?

नवी दिल्ली | सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे. जीएसटीसाठी मध्यरात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. यासाठी दोन्ही सभागृह एकत्र आली आणि जीएसटीला मंजुरी मिळाली. तर मग शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन का नाही ?, असा थेट सवाल खासदार राजू शेट्टींनी केला आहे.

शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या संतापातून देशभरातून हजारो शेतकरी गुरुवारी दिल्लीतील रामलीला मैदानात दाखल झालेत खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आज संसदेला घेराव घालणार आहेत. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संसदेला घेराव घालणार आहेत. या शेतकरी मोर्चाला संबोधित करताना खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

“सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत लाल किल्यावरुन भाषण करणारे पंतप्रधान कोण असतील हे देशातील शेतकरीच ठरवतील”, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे “शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणाऱ्यालाच शेतकरी पाठिंबा देतील. तर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्याचे नुकसानच होईल”, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts

प्रियांका गांधी यांची राजकारणात एन्ट्री

News Desk

पंतप्रधान मोदींची पहिलीच पत्रकार परिषद, मात्र पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीच

News Desk

काँग्रेस पक्षाचा १३४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

News Desk