मुंबई | मुंबईचत अरबी समुद्रामध्ये उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा खुलासा केला आहे.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 160 मीटर वरून 126 मीटर करण्यात आली आहे.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचे कारण गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जावा, असे असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताच अधिवेशनात प्रचंद गोंधळ झाला होता. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरुन विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता.
महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 160 मीटर वरून 126 मीटर करण्यात आली
कारण
फक्त एकच वल्लभभाई पटेल ह्यांचा गुजरात मधील होऊ घातलेल्या पुतळ्याला जागतिल सर्वात उंच म्हणून सन्मान मिळावा
महाराष्टावर प्रेम करणारा कुणी ही हें सहन करणार नाही
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 20, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.