HW News Marathi
राजकारण

थोड्याच वेळात शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई | राज्यात निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर आज (८ नोव्हेंबर) थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली पक्षाच्या सर्व जिल्ह्याध्यक्षांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीकरिता उद्धव ठाकरे नुकतेच ‘मातोश्री’वरून शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ही बैठक पार पडणार असून शिवसेनेच्या या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. या बैठकीला, शिवसेना नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. राज्यातील राजकीय स्थिती आणि ओल्या दुष्काळासंदर्भात ही बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.

उद्धव ठाकरे वांद्र्यातील रंगशारदा हॉटेलमध्ये येण्याची शक्यता

शिवसेनाभवनातील ही जिल्हाध्यक्षांसोबतची बैठक आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे वांद्र्यातील रंगशारदा हॉटेलमध्ये येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेचे ४० आमदार सध्या रंगशारदा हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेसंदर्भात आपल्या आमदारांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे थोड्याच वेळात रंगशारदा हॉटेलमध्ये दाखल होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. फोफोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सध्या आमदारांसंदर्भात सतर्क भूमिका घेत असल्याचे दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींनी फोनवरून संजय राऊतांच्या तब्येतीची केली विचारपूस

Aprna

अमित शहांनी घेतले सिद्धिविनायक दर्शन

swarit

तेजबहादूर यादव यांची वाराणसीची उमेदवारी रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव

News Desk