HW News Marathi
राजकारण

म्हणून अजित पवारांना मिळाले विरोधी पक्षनेते पद; ‘या’ भाजपच्या नेत्याचा दावा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर विश्वास नाही. अजित पवार (Ajit Pawar) यांनी धमकी दिल्यामुळे त्यांना राज्यात विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदा मिळाले आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.

अजित पवारवर टीका करताना अजयकुमार मिश्रा म्हणाले, “अजित पवारांवर त्यांचे शरद पवार ही विश्वास ठेवत नाही. शरद पवार हे पक्षातील दुसऱ्या नेत्यांना विधानसभा विरोधी पक्षनेता बनवणार असून ऐनवेळी त्यांनी धमकी दिल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिले. हे लोक मुख्यमंत्री पदासाठी तडजोड करणारी आहेत”

अजयकुमार मिश्रा हे 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पक्षबांधणीसाठी आज साताऱ्यातील कराड येथे आले होते. यावेळी अजयकुमार मिश्रा यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. या चर्चेनंतर अजयकुमार मिश्रा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान राहुल गांधींनी त्यांच्या पक्षातील लोक गांभीर्याने घेत नाही, अशी टीका अजयकुमार मिश्रा यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर केली आहे.

 

 

 

 

Related posts

सरकारमधील मंत्र्यांची दालने म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे | धनंजय मुंडे

News Desk

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने राहुल गांधींचे मराठीतून ट्विट

News Desk

पवारांच्या कुटुंबातील एकही उमेदवार लोकसभेत जाणार नाही !

News Desk